‘यशोधन’ कार्यालयाचा कामगारांना मोठा आधार ः तांबे

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विविध गावांमधील घरेलू, असंघटित कामगार आणि बांधकाम मजूर यांच्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी ‘यशोधन’ कार्यालय सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळे त्यांचा या कामगारांना मोठा आधार असल्याचे गौरवोद्गार नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी काढले.

संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटित कामगारांना साहित्य संचाचे वितरण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या शांताबाई खैरे, अहमदनगर असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष तथा उपसरपंच संजय कोल्हे, शिवाजी खुळे, डॉ. तुषार दिघे, दादासाहेब गुजांळ, युवा कार्यकर्ते किरण खुळे, सतीष वाळुंज, बाळासाहेब कोल्हे, विठ्ठल खुळे, अनिल खुळे, अशोक दिघे, शिवाजी खुळे, धनंजय खुळे, पोपट वाळुंज, पशुपतीनाथ कोल्हे, डॉ. शांताराम खुळे आदी उपस्थित होते.

Visits: 119 Today: 2 Total: 1114244

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *