अरे व्वा..! शहरातील रुग्णवाढ जवळपास थांबली..! ग्रामीण भागातील संक्रमणात मात्र आजही सातत्य, जोर्वे येथे कोविडचा प्रादुर्भाव सुरुच..

नायक वृत्तसेवा संगमनेर

संगमनेरकरांवर दिलाशाचा वर्षाव करणाऱ्या ऑक्टोबर महिन्यातील समाधानकारक वातावरण कायम असून, आजही तालुक्यात तिशीच्या आत रुग्णसंख्या आढळून आली आहे. आजच्या दिवसाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शहरातील साई नगर मधील एकमेव रुग्णाचा अहवाल वगळता शहरातील रुग्णवाढ आज थांबली आहे. तर ग्रामीणभागातून 25 रुग्ण समोर आले असून त्यातील 12 रुग्ण एकट्या जोर्वे येथून समोर आले आहेत. गेल्या दोन दिवसात एकट्या जोर्वे येथून तब्बल 23 रुग्ण समोर आले आहेत. तालुक्याच्या एकूण रुग्ण संख्येत आज 26 रुग्णांची भर पडल्याने आता बाधितांची एकूण संख्या 41 व्या शतकाच्या उंबरठ्यावर जाऊन 4 हजार 91 वर 4 हजार 91 वर पोहोचली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीपासून तालुक्यातील रुग्ण गतीत मोठा बदल झाला आहे. सप्टेंबरच्या तीस दिवसांमध्ये दररोज सरासरी 52 रुग्ण समोर येत असताना या महिन्याने मात्र संगमनेरकरांना मोठा दिलासा दिला आहे. आजची रुग्णसंख्या गृहीत धरुन गेल्या चोवीस दिवसांमध्ये रुग्णवाढीच्या गतीत अमुलाग्र बदल झाल्याचे दिसत आहे. आज सरासरी दररोज 35 रुग्ण या गतीने तालुक्यातील रुग्ण वाढ होत असून यात आणखीन घट होण्याची शक्यता आहे. खरेतर बकरी ईद, जन्माष्टमी, रक्षाबंधन, गणेशोत्सव व मोहरम सारख्या उत्सवांमुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रुग्णगती वाढल्याचे सांगितले जात होते. त्या नियमानुसार नवरात्रोत्सवातही रुग्णगती वाढण्याची अपेक्षा होती. मात्र तालुक्यातील सर्व देवस्थानांनी शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करून नवरात्रोत्सवातही मंदिरांची कवाडे बंद ठेवल्याने आणि भाविकांनीही देवस्थानांच्या नियमांंचा आदर केल्याने तालुक्यातील रुग्णवाढ आटोक्यात आणण्यात मोठी मदत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आज शहरानजीकच्या जोर्वे गावात एक प्रकारे कोविडचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी या गावातून 11 रुग्ण समोर आल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आजही तेथील बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. आजच्या अहवालातून येथील 89, 62, 56, 45 व 40 वर्षीय महिलांसह 19 वर्षीय तरुणी, तसेच 50, 45, 42, 38, 34 व 27 वर्षीय तरुण, सारोळे पठार येथील 54 व 32 वर्षीय महिला, कोकणगाव येथील 25 वर्षीय महिला, रहिमपुर येथील 28 वर्षीय तरुण,

घुलेवाडी येथील 31 वर्षीय महिलेसह 27 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी शिवारातील राहणे मळा येथील 35 वर्षीय तरुण, राजापूर येथील 78 वर्षीय महिलेसह 39 व 20 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे परिसरातील 28 वर्षीय तरुण, चंदनापुरीतील 58 वर्षीय इसम व निमोण येथील 38 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. तर शहरातील साईनगर परिसरात राहणाऱ्या 60 वर्षीय इसमाचा एकमेव अहवाल आज पॉझिटिव आला आहे. त्यामुळे शहरातील रुग्णवाढ आज जवळपास थांबल्याचे दिसून आले. तर ग्रामीण भागातील संक्रमणात अद्यापही सातत्य असल्याचे आजच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

तालुक्याच्या रुग्णसंख्येत आज 26 रुग्णांची भर पडल्याने तालुका आता 41 व्या शतकाच्या दारात जाऊन 4 हजार 91 वर पोहोचला आहे. यात शहरीभागातील 1 हजार 158 तर ग्रामीण भागातील 2 हजार 942 रुग्णांचा समावेश आहे. तालुक्याची एकूण रुग्णसंख्या मोठी वाटत असली तरीही आजच्या स्थितीत त्यातील केवळ 161 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तालुक्यातील 3 हजार 890 रुग्णांना आजवर यशस्वी उपचार देण्यात आले असून, तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता 95.69 टक्क्यांवर पोहोचले आहे, तर या महिन्यात आत्तापर्यंत शहरातील केवळ एकासह दोघांचे बळी गेल्याने तालुक्याचा मृत्यू दरही कमालीचा घसरला असून आजच्या स्थितीत तो 0.99 टक्क्यावर स्थिरावला आहे, संगमनेरकरांसाठी ही अत्यंत दिलासादायक बाब आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज ३९१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार १९८ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ९५.३८ टक्के झाले आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्येत २५४ बाधितांची नव्याने भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार ६८५ झाली आहे.

शासकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून आज अहमदनगर महापालिका क्षेत्रातील १६, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०१, पारनेर ०१, पाथर्डी १०, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०७ आणि इतर जिल्ह्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

खाजगी खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील १९, अकोले ०२, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०५, पारनेर ०१, राहाता ०३, राहुरी ०४, संगमनेर ०९ व श्रीरामपूर येथील ०९ जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत.

रॅपिड अँटीजेन चाचणीतूनही आज जिल्ह्यातील १५३ जण बाधित आढळुन आले. यामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ०५, अकोले १३, जामखेड ०६, कर्जत २५, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०८, पारनेर ०१, पाथर्डी १३, राहाता १४, राहुरी ०३, संगमनेर २१, शेवगाव २७, श्रीगोंदा ०८ व श्रीरामपूर येथील तिघांचा समावेश आहे.

आज जिल्ह्यातील ३९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ८८, अकोले ३८, जामखेड १५, कर्जत १८, कोपरगाव ०९, नगर ग्रा १६, नेवासा २२, पारनेर १९, पाथर्डी २३, राहाता २८, राहुरी १२, संगमनेर ४४, शेवगाव २३, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर २२ व लष्करी रुग्णालयातील एकाचा समावेश आहे.

  • जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या : ५२ हजार १९८..
  • जिल्ह्यात सध्या  उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : १ हजार ६८५..
  • जिल्ह्यातील आजवरचे एकूण मृत्यू : ८४१..
  • जिल्ह्यातील  एकूण  बाधितांची संख्या : ५४ हजार ७२४..
  • जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३८ टक्के..
  • आज जिल्ह्यातील ३९१ रुग्णांना डिस्चार्ज तर २५४ बाधितांची नव्याने भर..

Visits: 17 Today: 1 Total: 115079

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *