‘हॉटेल नेचर फॅमिली रेस्टॉरंट’ च्या दुसऱ्या शाखेची उत्साहात सुरुवात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील  वडगाव पान शिवारातील हॉटेल नेचर रिसॉर्ट च्या यशस्वी वाटचालीनंतर आता ‘हॉटेल नेचर’ ची दुसरी शाखा पुणे-नाशिक महामार्गावरील खंदरमाळ (ता. संगमनेर) येथे सुरू करण्यात आली असून या शाखेचे उद्घाटन शनिवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.
स्वादिष्ट भोजन, विनम्र सेवा आणि ग्राहकांप्रती असलेला विनम्र भाव यामुळे संचालक विजय थोरात यांना हॉटेल व्यवसायातील एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जाते. हॉटेल नेचर च्या दुसऱ्या  शाखेचे उद्घाटन सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे अध्यक्ष व मॅनेजिंग ट्रस्टी अशोक दुधाडे आणि  आ. अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी हॉटेलचे संचालक विजय थोरात, त्यांचे आई-वडील गणपत थोरात व कमल थोरात यांची उपस्थिती विशेष ठरली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  डॉ. अरुण इथापे होते. उद्घाटन सोहळ्याला सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे डेप्युटी सेक्रेटरी अमोल कासार, नगर विभागाचे रिजन हेड डॉ. सागर हासे, डेप्युटी रिजन हेड डॉ. सागर गोपाळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय फटांगरे, सेवानिवृत्त आरटीओ अनिल आहेर, खंदरमाळ ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश लेंडे, तसेच सॅटर्डे ग्रुपचे जनरल सेक्रेटरी सुहास फडणीस आदी  उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. अरुण इथापे, अजय फटांगरे, गणेश लेंडे, अनिल आहेर यांनी आपल्या मनोगतातून हॉटेल नेचरच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सॅटर्डे ग्लोबल ट्रस्टचे अध्यक्ष अशोक दुधाडे आणि आ. अमोल खताळ यांनी देखील हॉटेल नेचरच्या संकल्पनेचे कौतुक करून ‘गुणवत्तापूर्ण व कौटुंबिक वातावरणात सेवा देणारे हे हॉटेल प्रवाशांसाठी एक उत्तम ठिकाण ठरेल,’असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला संगमनेर, घारगाव, सिन्नर, नाशिक व अहिल्यानगर येथील सॅटर्डे क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हॉटेल नेचर फॅमिली रेस्टॉरंटचे संचालक विजय थोरात यांच्यासोबत हिरकणी ग्रुपच्या अध्यक्षा लतिका थोरात, तसेच प्रणव विजय थोरात, आलोक विजय थोरात आणि थोरात परिवारातील सदस्य उपस्थित होते. समारंभानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. नव्या शाखेच्या उद्घाटनामुळे या परिसरात प्रवाशांसाठी स्वच्छ, सुंदर आणि कौटुंबिक वातावरणात भोजनाची उत्कृष्ट सुविधा उपलब्ध होणार आहे.
Visits: 94 Today: 3 Total: 1114195

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *