विद्यार्थीनींसमोर तरुणाचे नग्नावस्थेत विकृत चाळे! संगमनेरातील संतापजनक प्रकार; परप्रांतीय विकृताला जमावाने धुऽधूऽ धुतला..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता संगमनेरातून अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेत शाळा-महाविद्यालयात जाणार्‍या विद्यार्थीनींच्या मार्गात थांबून शाहरुख गुलामनबी अन्सारी हा परप्रांतीय विकृत संपूर्ण नग्न होत विकृत चाळे करीत असल्याचे समोर आले आहे. सुकेवाडी रस्त्यावर गेल्या दीड महिन्यापासून सुरु असलेल्या या प्रकाराबाबत सुकेवाडीतील ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी आज सकाळी पावणेसातच्या सुमारास त्या विकृताना नग्नावस्थेतच गाठीत धुऽधूऽ धुतला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र शहर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत त्या विकृताला ताब्यात घेतल्यानंतर तणाव निवळला. या घटनेने संपूर्ण तालुक्यात संताप निर्माण झाला असून शहरातील बेकायदा वास्तव्याचा प्रश्‍नही चव्हाट्यावर येवू लागला आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज (ता.12) सकाळी पावणेसातच्या सुमारास सदरचा प्रकार घडला. गेल्याकाही वर्षात गावठाणात असलेल्या शहराचा आसपासच्या ग्रामीण क्षेत्रात विस्तार होवून मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. शहरालगतच्या कासारवाडीसह गुंजाळवाडी, राजापूर, वेल्हाळे, घुलेवाडी, सुकेवाडी, समनापूर या गावांच्या शिवारात तर अक्षरशः मानवी वसाहतींची दाटी झाल्याचे बघायला मिळते.


साहजिकच त्यामुळे व्यापारी आस्थापने, दुकाने व अन्य नागरी सुविधांसह शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण देणार्‍या संस्थांचीही संख्या वाढली आहे. परिणामी शहरासह आसपासच्या उपनगरातील शेकडों विद्यार्थी पहाटेपासूनच वेगवेगळे क्लास व नियमित शाळा-महाविद्यालयांच्या वर्गासाठी सायकल, मोपेडवरुन घरातून बाहेर पडतात. मात्र संगमनेर शहराच्या अगदी लगतच असलेल्या सुकेवाडी शिवारातून मात्र विद्यार्थीनींच्या सुरक्षेवरच प्रश्‍नचिन्ह उभे करणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.


या घटनेत मूळचा उत्तरप्रदेशातील मात्र येथेच सुकेवाडी परिसरातच स्थिरावलेला शाहरुख गुलामनबी अन्सारी हा परप्रांतीय विकृत गेल्या दीड महिन्यापासून सुकेवाडी रस्त्यावर भल्या पहाटेच लहान मुली व शाळा-महाविद्यालयात जाणार्‍या विद्यार्थीनींकडे पाहुन अश्‍लिल हरकती करीत असल्याचे समोर आले आहे. पहाटेपासून मुलींच्या रस्त्यावर थांबून मानवी रुपातील हे जनावर त्यांना पाहताच निर्वस्त्र व्हायचे व नको तसे हायभाव करीत रस्त्यावर हैदोस घालायचे. त्याच्या या विकृत प्रकाराची विद्यार्थीनींना अक्षरशः किळस यायची, पण सांगायचं कसं हा प्रश्‍न असल्याने त्यांच्याकडून गेला दीड महिना हा प्रकार सहन केला जात होता.


विद्यार्थीनींकडून होणार्‍या दुर्लक्षामुळे त्याच्यातील हिम्मतही वाढली होती. त्यामुळे त्याच्याकडून एखादे दूष्कृत्य घडण्याचीही शक्यता होती. मात्र तसेकाही घडण्यापूर्वीच त्या नालायकाची विकृती उघडी पडली. आज सकाळीच सुकेवाडीतील काही ग्रामस्थांनी त्याला आक्षेपार्ह अवस्थेत रस्त्यातच गाठून बेदम चोपून काढले. त्यामुळे या परिसरात काहीकाळ मोठा तणावही निर्माण झाला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.


या प्रकरणी शाहरुक गुलामनबी अन्सारी (मूळ रा.उत्तरप्रदेश, ह.मु सुकेवाडी) याच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 75 (लैंगिक छळवणूक) व कलम 79 (विनयभंग) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्या विकृताला गजाआड करण्यात आले आहे. सुकेवाडीच्या ग्रामस्थांनी वेळीच या प्रकाराकडे लक्ष दिल्याने या विकृताकडून कोणताही अनर्थ घडण्यापूर्वीच त्याच्या मुसक्या आवळल्या गेलया. समाजातील अन्य संस्था व व्यक्तिंनीही त्याचे अनुकरण करण्याची गरज आहे. या घटनेने संपूण तालुक्यातून संताप व्यक्त होत असून त्या विकृताला कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे.

Visits: 21 Today: 2 Total: 152910

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *