दिलासाच, पण संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या पोहोचली चार हजारांच्या पार..! शहरातील तिघांसह तालुक्यातील वीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून संगमनेरकरांवर होणारा ‘कोविड दिलासा वर्षाव’ आजही कायम आहे. आज खासगी प्रयोगशाळेच्या सहा अहवालांंसह रॅपिड अँटीजेन चाचणीतून शहरातील तिघांसह तालुक्यातील एकूण 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजही शहरासह ग्रामीण क्षेत्रातील रुग्णसंख्या कमी असल्याने दिलासादायक वातावरण कायम आहे. मात्र आजच्या  रुग्णवाढीतून तालुक्याने चार हजारांचा टप्पा ओलांडला असून रुग्णसंख्या 4 हजार 5 वर पोहोचली आहे.

सप्टेंबरमध्ये शिखरावर पोहोचलेली तालुक्यातील रुग्णगती या महिन्याच्या सुरुवातीपासून काहीशी मंदावल्याने गेल्या 20 दिवसांपासून संगमनेरकरांना सलग दिलासा मिळत आहे. त्यातही नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरातील अवघ्या दोघांसह एकूण आठ जणांचे, सोमवारी (ता.19) शहरातील सहा जणांसह एकूण 14 जणांचे तर मंगळवारी शहरातील चौघांसह एकूण 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. दररोजच्या सरासरीनुसार ही संख्या खुपच कमी असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून सलग कोविड बाधितांचा सलग क्रम पाहून हादरलेल्या संगमनेर तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. आजही हा क्रम कायम असल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील इंदिरानगर परिसरातील 30 वर्षीय तरुण, जिल्हा बँके समोरील परिसरातून 45 वर्षीय इसमासह 40 वर्षीय महिला संक्रमित असल्याचे समोर आले आहे. त्यासोबतच तालुक्यातील गुंजाळवाडी येथून आज पुन्हा एकदा सात रुग्ण समोर आले असून त्यात 40 वर्षीय महिलेसह 40 व 23 वर्षीय तरुण, दोन वर्षीय बालिकेसह अवघ्या तीन महिन्यांच्या बाळालाही संक्रमण झाले आहे तर शिवारातील रहाणे मळा भागात राहणाऱ्या 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 25 वर्षीय महिला,

धांदरफळ बुद्रुक मधील 35 वर्षीय तरुण, चिकणी मधून 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, सारोळे पठार येथील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 वर्षीय इसम व बारा वर्षीय बालक, बोटा येथील 49 वर्षीय इसम, समनापुर येथील 49 वर्षीय इसम तर रहिमपूर येथील 58 वर्षीय इसमासह 48 व 23 वर्षीय महिला संक्रमित झाल्या आहेत. आजच्या अहवालातून तालुक्याच्या रुग्‍ण संख्येत 20 जणांची भर पडल्याने बाधितांची संख्या चार हजारांचा टप्पा ओलांडून 4 हजार 5 वर जाऊन पोहोचली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज ३३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार २५० झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाणही आता ९५.२२ टक्के झाले आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत ३०४ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची एकूण संख्या १ हजार ७४० झाली आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ३६, अकोले १०, कर्जत ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०७, पारनेर ०४, राहाता १०, राहुरी ०५, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०२ व श्रीरामपूर येथील आठ रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील १४, नगर ग्रामीण ०७, पाथर्डी ०२, राहाता ०१, राहुरी ०२, संगमनेर ०६, आणि श्रीरामपूर येथील एकाला कोविडचेे संक्रमण झाले असल्याचे समोर आले आहे.

रॅपिड अँटीजेन चाचणीतूनही आज १७२ जण बाधित आढळुन आले. यामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील १६, अकोले २६, जामखेड ०४, कर्जत ०५, कोपरगाव ०४, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०४, पारनेर १०, पाथर्डी ३५, राहाता १४, राहुरी ०९, संगमनेर १४, शेवगाव १२ श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर ०४, व लष्करी परिसरातील तिघांचा समावेश आहे.

आज जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व कोविड केअर सेंटर मधून ३३२ रुग्णांना उपचार पूर्ण केल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ७४, अकोले १२,जामखेड १४, कर्जत १५, कोपरगाव १४, नगर ग्रामीण ५, नेवासा १६, पारनेर १७, पाथर्डी ५१, राहाता २०, राहुरी ८, संगमनेर ३८, शेवगाव २३, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर १४, व लष्करी रुग्णालयातील एकाचा समावेश आहे.

  • जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या : ५१ हजार २५०..
  • जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची एकूण संख्या : १ हजार ७४०..
  • जिल्ह्यातील आजवरचे एकूण कोविड मृत्यू : ८३३..
  • जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या:५३ हजार ८२३
  • जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण ९५.२२ टक्के
  • आज जिल्ह्यातील ३३२ रुग्णांना डिस्चार्ज तर ३०४ बाधितांची पडली नव्याने भर..

Visits: 36 Today: 1 Total: 255614

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *