गतीमंद तरूणीवर अत्याचार करणार्या नराधमास अटक
गतीमंद तरूणीवर अत्याचार करणार्या नराधमास अटक
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील एका गतीमंद तरूणीवर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन अत्याचार करणार्या नराधमास अकोले पोलिसांनी अटक केली आहे.

ब्राह्मणवाडा येथील 32 वर्षीय गतीमंद तरूणी व तिची आई या दोघी शेतात राहत आहे. तिची आई रानात कामाला गेल्यावर गतीमंद तरूणी घरात एकटीच राहत होती. तिच्या घरापासून अगदी थोड्या अंतरावर राहणारा पप्पू रंगनाथ फलके हा तरूण तिच्या घरी येऊन गप्पा मारत तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन अत्याचार करत होता. सदर प्रकार जानेवारीपासून चालू होता. दोन महिन्यांपूर्वी तिचे पोटात दुखत असल्यामुळे घारगाव येथील दवाखान्यात तिची आई घेऊन गेली असता हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर पीडितेच्या आईने थेट घारगाव पोलीस ठाणे गाठत हकीगत सांगितली. पीडितेला अति वेदना होत असल्याने आळेफाटा येथील दवाखान्यात भरती करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी गर्भपात करण्याचा सल्ला दिला. मात्र, गर्भपातानंतर मृत अर्भकाला पीडितेने जन्म दिला आहे. या प्रकरणी गतीमंद तरूणीने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी पप्पू फलके या आरोपीस अटक केली असून त्याला आज (बुधवारी ता.19) न्यायालयात हजर करणार आहे.

