समृद्धी महामार्गावरील धोत्रे शिवारात भीषण अपघातात तीन ठार नादुरुस्त ट्रेलरला भरधाव वेगातील कारने दिली जोराची धडक


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या पुन्हा वाढली आहे. समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात शुक्रवारी (ता.९) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या नादुरुस्त ट्रेलरला भरधाव स्विफ्ट कारने धडक दिली. या भीषण अपघात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी आहेत.

जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर तिघांचे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी याच परिसरात अपघात होऊन कल्याण येथील दोघा तरुणांचा मृत्यू झाला होता आणि आज पुन्हा तीन जणांचा मृत्यू झाला. राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे असे अपघातातील मृतांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्विफ्ट डिझायर कारमध्ये (क्र. एमएच.२१, बीएफ.९२४८) पाच जण जालन्याहून शिर्डीच्या दिशेने जात असताना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात चॅनल नंबर ५०४ जवळ रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या नादुरुस्त कंटेनर ट्रेलरला (क्र. एमएच.४६, एएफ.९८३३) पाठीमागून जोराची धडक दिली. यामधे स्विफ्ट कारमध्ये असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

ही धडक इतकी जोराची होती की स्विफ्ट कारचा पुढील भाग पूर्ण चक्काचूर झाला. दरम्यान, कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला. मृत राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे हे जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील रहिवासी असल्याचे कळते ते शिर्डीकडे निघाले होते. अपघातात फलके आणि वाघ हे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच धोत्रे ग्रामस्थांसह कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी तसेच महामार्ग पोलीस उपनिरिक्षक विशाल सनस आणि कर्मचारी तसेच क्यूआरव्ही टीम आणि एमएसएफचे जवान तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना उपचारांसाठी पाठवले

Visits: 14 Today: 1 Total: 115535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *