जमजम वसाहतीमध्ये पोलिसांचा छापा; गोमांससह जनावरे ताब्यात

जमजम वसाहतीमध्ये पोलिसांचा छापा; गोमांससह जनावरे ताब्यात
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील जमजम वसाहतीमध्ये शहर पोलिसांनी गुरुवारी (ता.8) सायंकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास छापा मारत 800 किलो गोमांस, पाच जर्सी वासरे आणि एक जर्सी गाय असा एकूण 1 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.


याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शहरातील जमजम वसाहतीमध्ये जहीर अन्वर कुरेशी याच्या वाड्यात गोमांस आणि कत्तलीच्या उद्देशाने जनावरे ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यावरुन पोलिसांनी छापा मारत 1 लाख 60 हजार रुपयांचे 800 किलो गोमांस, 25 हजार रुपये किंमतीचे पाच जर्सी वासरे आणि 10 हजार रुपये किंमतीची एक जर्सी गास असा एकूण 1 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक रमेश लबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी जहीर कुरेशी याच्याविरोधात गुरनं.1828/2020, भादंवि कलम 269, 429 महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी कायदा 1995चे सुधारित 2015चे कलम 5(क), 5(अ), 9, 9(अ),1 सह प्राण्यांना निर्दयतेने वागणूक देणे कायदा कलम 3, 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आशिष आरवडे हे करत आहे.

Visits: 182 Today: 1 Total: 1980180

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *