ढोरवाडी येथे दीड एकर कांद्यावर अज्ञाताने फवारले तणनाशक

ढोरवाडी येथे दीड एकर कांद्यावर अज्ञाताने फवारले तणनाशक
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील ढोरवाडी येथील शेतकर्‍याच्या दीड एकर लाल कांद्यावर अज्ञाताने ‘रोगर’ नावाचे तणनाशक मारल्याने काढणीसाठी आलेला कांदा पूर्णतः वाया गेला आहे. यामध्ये शेतकर्‍याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत नुकसानग्रस्त शेतकरी मधुकर काशिनाथ जाधव यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, माझे दीड एकर क्षेत्रावर दोन महिन्यांपूर्वी लाल कांद्याची लागवड केली होती. ऐन अतिवृष्टी, धुके आणि निसर्गाचा लहरीपणा यावर मात करीत कांद्याची मोठ्या हिंमतीने जोपासना केली. मात्र, दोन दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी अज्ञाताने रोगर तणनाशक मारुन कांद्याचे पूर्णतः नुकसान केले. यामुळे माझे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया शेतकरी जाधव यांनी दिली. याबाबत तलाठी, पोलीस पाटील व पुढार्‍यांनी कांद्याची पाहणी केली आहे. कांद्याचे गगनाला भिडलेले बाजारभाव यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच या शेतकर्‍याचे नुकसान झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करुन भरपाई देण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

Visits: 219 Today: 1 Total: 1873274

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *