राज्यस्तरीय स्पोर्टस डान्स स्पर्धेत ध्रुव ग्लोबलचे नेत्रदीपक यश! कोल्हापूर येथे पार पडली स्पर्धा; एकवीस सुवर्णसह रौप्यपदकांची लयलुट


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोल्हापूर येथे पार पडलेल्या दहाव्या राज्यस्तरीय सबज्युनिअर, ज्युनिअर आणि सिनिअर गटातील स्पोटर्स डान्स चॅम्पियनशीप स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने नेत्रदीपक यश संपादन केले. या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करताना ध्रुवच्या स्पर्धकांनी २१ सुवर्णसह २१ रौप्यपदकांची कमाई करीत पदकांची अक्षरशः लयलुट केली. स्पर्धेतील एकूण कामगिरीच्या जोरावर ध्रुव ग्लोबल स्कूलने दुसरा क्रमांकही पटकावला.

मुलींच्या १३ वर्षांखालील गटात ईश्वरी गोकुळ खताळने विश्वेश्वर वंदना सादर करताना प्रथम तर, लोकनृत्य प्रकारातील रासर केली नृत्य सादर करताना द्वितीय क्रमांक मिळवला. या वयोगटातील सांघिक प्रकारात मुलींच्या गटाने सादर केलेल्या कोनाडू या लोकनृत्य प्रकाराला रौप्यपदाकाने सन्मानित करण्यात आले. या संघात देवश्री अतुल देशमुख, आराध्या सुरेश रहाणे, काव्या स्वप्नील माळवे, सोहम नेमीनाथ चौधरी, श्रेयस श्रीगोपाल भट्टड, तनिष्का मोहन आहेर, श्रेया महेश मयूर, आरोही सचिन आवारी, ओवी बाळासाहेब ठोंबरे, श्लोक प्रसाद मते, दर्शी पंकज पटेल, अर्णवी हृषीकेष शहाणे, मधुरा राजू कानवडे आणि आराध्या जनार्दन पुजारी यांचा समावेश होता.

तर, नवदुर्गा नृत्य प्रकार सादर करताना देवश्री देशमुख, सोहम चौधरी, श्रेयस भट्टड, तनिष्का आहेर, ओवी ठोंबरे, श्लोक मते, दर्शी पटेल, अर्णवी शहाणे, मधुरा कानवडे आणि आराध्या पुजारी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. याच वयोगटात नमामि नृत्य सादर करताना ध्रुव ग्लोबल स्कूलच्या राधा प्रशांत रहाणे, आराध्या रहाणे, काव्या माळवे, आरोही आवारी, श्रेया मयूर, अपूर्वा संदीप सहाणे, प्रणवी राजलिंगम माने, समृद्धी राजेंद्र भाग्यवंत, यशोधरा लक्ष्मीकांत नाईकवाडी आणि मनस्वी मारुती भांडकोळी यांच्या गटानेही प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक मिळवताना संपूर्ण स्पर्धेतील शाळेचा आलेख उंचावला. ध्रुव ग्लोबल स्कूलच्या नृत्य प्रशिक्षिका सोनाली महोपात्रा व गंधर्व पिलाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Visits: 146 Today: 1 Total: 1591657

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *