संगमनेर तालुका निघाला तिसर्‍या सहस्रकाकडे! चाचण्यांचा वेग वाढल्याने तालुक्याच्या रुग्णसंख्येत पडू लागली पुन्हा मोठी भर..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील रुग्णवाढीचा वेग पुन्हा एकदा गतीमान झाल्याचे चित्र गेल्या दोन दिवसांत समोर आले आहे. अर्थात आता प्रशासनाने रुग्णसंख्येला अधिक महत्त्व देण्यापेक्षा बाधित रुग्ण शोधण्यावर लक्ष्य केंद्रीत केल्याने वाढलेल्या रुग्णसंख्येतही संगमनेरकरांचे हितच दिसत आहे. शुक्रवारीही अन्य सामान्य चाचण्यांसह शासकीय विभागातील कामगार पोलीस पाटलांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यातून दोन कर्मचाऱ्यांसह 72 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्याने दोन दिवसांत तिन शतकांचा टप्पा ओलांडीत तिसर्‍या सहस्रकाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकतांना 2 हजार 956 रुग्णसंख्या गाठली आहे.


गेल्या दोन-तिन दिवसांत रुग्णसमोर येण्याचा वेग काही प्रमाणात घटल्याचे समोर आले होते, मात्र प्रत्यक्षात तसे काहीही नव्हते. स्थानिक यंत्रणेकडून काही प्रमाणात चाचण्यांची गती कमी झाल्याने दररोजच्या रुग्णसंख्येत काहीशी घट झाल्याचे दिसत होते. मात्र गुरुवारपासून पुन्हा एकदा चाचण्यांचा वेग वाढल्याने शहरासह तालुक्यातील रुग्ण समोर येण्याची गतीही वाढली आहे. त्यातच गुरुवारपासून शासकीय सेवेतील सर्व विभागांमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या जात असल्यानेही रुग्णवाढीला काहीशी गती प्राप्त झाली आहे. बाधितांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने धाडसी पाऊल उचलले आहे, त्यामुळे रुग्णवाढ दिसत असली तरीही त्यातून संगमनेरकरांचे हितच जोपासले जाणार आहे.


सध्या आढळणार्‍या रुग्णांमध्ये लक्षणे नसतानाही संक्रमित असलेल्या रुग्णांची अधिक संख्या आहे. अशा स्थितीत कोविडची लागण होवूनही संबंधिताला लक्षणांअभावी ते समजत नसल्याने अशी व्यक्ति अनेकांना संक्रमित करणारी ‘कोविड वाहक’ ठरु शकते. त्यामुळे चाचण्यांना वेग देवून अशा लक्षणं नसलेल्या रुग्णांचा शोध घेणं आणि त्यांना विलगीकरणात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा रुग्णांचा शोध घेण्याची मोहिम सुरु करतांना त्याचा शुभारंभच शासकीय कार्यालयांपासून केला आहे. या कडीत गुरुवारी महसुल विभागातील पाच जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले होते.

शुक्रवारी कामगार पोलीस पाटलांसह शहर व तालुक्यातील अन्य नागरिकांच्या स्राव तपासणीत 72 रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यात शहरातील स्वातंत्र्य चौक परिसरातील 71 वर्षीय महिला, मोतीनगर परिसरातील 33 वर्षीय तरुणासह सात वर्षीय बालक, चैतन्य नगर परिसरातील 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, नवीन नगर रोड परिसरातील 18 वर्षीय तरुण, मालदाड रोड वरील 66 व 28 वर्षीय महिलेसह 55 वर्षीय इसम, घोडेकर मळ्यातील 24 वर्षीय तरुण, जनतानगर येथील 33 वर्षीय तरुण व वडजे मळा भागातील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यासोबतच ग्रामीण भागातील बेट सांगवी येथील 78 वर्षीय वयोवृद्ध, खंडेरायवाडी येथील 58 वर्षीय इसम, पिंपरणे येथील 25 वर्षीय तरुण, हंगेवाडी येथील 54, 45, 24 व 18 वर्षीय महिला, तसेच 26 व 23 वर्षीय तरुण,

कोठे बुद्रुक मधील 85 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 56 वर्षीय महिला, सावरगाव घुले येथील 70, 30 व 16 वर्षीय महिलासह 38 वर्षीय तरुण व 12 वर्षीय बालक, कर्‍हे येथील 19 वर्षीय तरुण, प्रतापपूर येथील 41, 41, 15 व 22 वर्षीय महिला व 17 वर्षीय तरुण, रहिमपूर येथील 37 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 62 वर्षीय वृद्ध नागरिकासह 35 वर्षीय तरुण व 60, 27, 20 वर्षीय महिला, कोकणगाव येथील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 17 वर्षीय महिला व 13 वर्षीय बालक, कोंची येथील 55 वर्षीय इसम, देवकौठे येथील 31 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, संगमनेर खुर्दमधील 39 वर्षीय तरुण, वडगाव लांडगा येथील 55 वर्षीय इसम, घुलेवाडी येथील 52, 47, 28, 15 व 10 वर्षीय पुरुषासह 60, 47 व 41 वर्षीय महिला,

राजापूर येथील 59 व 30 वर्षीय पुरुषासह 50 वर्षीय महिला, कणकापूर येथील 42 वर्षीय महिला, नांदुरी दुमाला येथील 35 वर्षीय महिला, वाघापूर येथील 35 वर्षीय तरुण, मिर्झापूरमधील 48 वर्षीय इसमासह 18 वर्षीय तरुण, जवळे कडलग येथील 10 वर्षीय बालिका, निमागाव भोजापूर येथील 48 वर्षीय इसमासह 40 वर्षीय महिला, आंबी दुमाला येथील 38 वर्षीय तरुण, अकलापूर येथील 60 वर्षीय इसमासह 54 वर्षीय महिला, माळवाडी येथील 28 वर्षीय तरुण व मुंजेवाडी येथील 26 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही 72 रुग्णांची भर पडल्याने गेल्या तीन दिवसांत तिसरे शतक ओलांडीत तालुक्याने तिसर्‍या सहस्रकाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकीत 2 हजार 956 रुग्णसंख्या गाठली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज ५१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार १५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ८८.६८ टक्के इतके झाले आहे. आज जिल्ह्यातील रूग्ण संख्येत १२१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३९४५ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्र ६२, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण १०, श्रीरामपूर ०९, लष्करी परिसर ०२, नेवासा ०५, श्रीगोंदा ०४,पारनेर ०१, अकोले १७, कोपरगाव ०२, कर्जत ०१, लष्करी रुग्णालय ०६ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ५१३ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्र ८०, संगमनेर २७, राहाता ५८, पाथर्डी ३६, नगर ग्रामीण ४२, श्रीरामपूर १५, नेवासा १९, श्रीगोंदा ०७, पारनेर २३, अकोले ४६, राहुरी ३३, शेवगाव १५, कोपरगाव ४७, जामखेड ४०, कर्जत २०, लष्करी रुग्णालय ०३ आणि इतर जिल्ह्यातील ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • जिल्ह्यातील उपचार सुरू असलेले रूग्ण : ३ हजार ९४५..
  • जिल्ह्यातील एकुण मृत्यू : ६६९..
  • जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या : ४० हजार ७७१..
  • आतापर्यंत ३६ हजार १५७ रुग्ण बरे होऊन घरी परतले..
  • जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.६८ टक्के..
  • जिल्ह्यात आज १२१ बाधितांची रुग्णसंख्येत भर..

Visits: 164 Today: 3 Total: 1110860

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *