साकूरमधील जुगारअड्ड्यावर घारगाव पोलिसांचा छापा
साकूरमधील जुगारअड्ड्यावर घारगाव पोलिसांचा छापा
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील साकूर येथे अवैधरित्या जुगार खेळणार्या सात जणांना घारगाव पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून साडेसात हजार रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. सदर कारवाई गुरुवारी (ता.15) सायंकाळी साडेपाच ते साडेसहा दरम्यान केली आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, साकूर येथील अशोक सदाशिव शेलार याच्या शेतातील घराच्या आडोशाला बिनधास्तपणे तिरट नावाचा हारजितीचा जुगार सोमनाथ देवराम शिंदे (बिरेवाडी), कैलास मोहन आहेर (चिखलठाण, ता.राहुरी), संतोष सखाराम देवकाते (रा.चितळकर वस्ती, साकूर), अशोक नाना कोळेकर (रा.चिंचेवाडी), विलास रावसाहेब केकाण (रा.हिवरगाव पठार), बाजीराव सतू खेमनर (रा.हिरेवाडी), सतीष अर्जुन बारवे (रा.साकूर) हे सातजण गुरुवारी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा दरम्यान खेळत होते. याची माहिती गुप्त खबर्यामार्फत घारगावचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांना समजली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जुगारअड्ड्यावर छापा मारत सात हजार सहाशे चाळीस रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई नामदवे बिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील सात जणांविरुद्ध गुरनं.388/2020 मुं.जु.का.कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जी. पी. लोंढे हे करत आहे.