‘मनसे’चे हिवरगाव पावसा टोलनाक्याला निवेदन

‘मनसे’चे हिवरगाव पावसा टोलनाक्याला निवेदन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाका प्रशासनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी आंदोलन करत स्थानिक वाहनचालकांना त्रास दिल्यास आणि रस्त्यावरील खड्डे न बुजविल्यास मनसे स्टाईलने खळखट्ट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.


हिवरगाव पावसा टोलनाक्याच्या अंतर्गत असणार्‍या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे अनेक वाहनांचे अपघात होत आहेत. तसेच टोलनाक्यावरील गुंड प्रवृत्तीच्या कर्मचार्‍यांकडून स्थानिक नागरिकांना नेहमी त्रास होतो. याची दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी टोलनाक्याच्या कारभाराविरोधात आंदोलन करून निषेध व्यक्त केला. यापुढे स्थानिक वाहनचालकांना त्रास दिल्यास आणि रस्त्यावरील खड्डे त्वरीत न बुजविल्यास मनसे स्टाईलने खळखट्ट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. सदर निवेदन देतेवेळी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, जिल्हा सरचिटणीस तुषार बोबडे, जिल्हा सचिव डॉ.संजय नवतर, संगमनेर तालुकाध्यक्ष संजय वाणी, शहराध्यक्ष तुषार ठाकूर, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष रामा शिंदे, शहराध्यक्ष संकेत लोंढे, उपशहराध्यक्ष प्रमोद काळे, गिरीश उमाप आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Visits: 114 Today: 4 Total: 1110733

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *