जिल्ह्यात आज मार्चमधील विक्रमी रुग्णसंख्या! संगमनेर तालुक्यातही पंच्चावन्नजणांचे अहवाल पॉझिटिव्ह..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यात सुरु झालेले कोविडचे संक्रमण दिवसागणिक उग्ररुप धारण करीत आहेत. अहमदनगर तालुक्यासह संगमनेर, राहाता व कोपरगाव तालुक्यात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत असल्याने जिल्ह्याची कोविड स्थिती पुन्हा एकदा भयानक अवस्थेत पोहोचू पहात आहे. रोजच्या सरासरीत जिल्ह्यात आज विक्रमी 559 रुग्णांची भर पडली. त्यात सर्वाधीक 243 रुग्ण नगर तालुक्यात तर सर्वाधीक कमी तीन रुग्ण कर्जत तालुक्यातून समोर आले. संगमनेर तालुक्यातही 55 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्याची रुग्णसंख्या आता 7 हजार 424 वर पोहोचली आहे. सध्या तालुक्यात 295 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत.


गेल्या महिन्याभरापासून माघारी परतलेल्या कोविडच्या संक्रमणाने जिल्ह्यातील स्थिती कठीण अवस्थत नेवून ठेवली आहे. प्रशासनाकडून वारंवार सूचना व नियमांची अंमलबजावणी होवूनही काही नागरिकांचा हलगर्जीपणा जिल्ह्यात कोविडला पुन्हा निमंत्रण देणारा ठरला आहे. त्याचा परिणाम नववर्षात जवळपास समाप्तीच्या दिशेने निघालेल्या कोविडचा पुन्हा एकदा उद्रेक झाला असून चालूू महिन्यात रुग्णवाढीचा नवा उच्चांक निर्माण होण्याची भिती निर्माण झाली आहे. सध्याच्या संक्रमणातून व्यपारी, उच्चभ्रु व सामान्य अशा सगळ्यांनाच कोविडची लागण होत असल्याचे निरीक्षणही समोर आले आहे.


फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात दररोज सरासरी शंभर रुग्ण समोर येत होते, टप्प्याटप्प्याने त्यात वाढ होत आज जिल्ह्यातून तब्बल 559 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. संक्रमणाचा सर्वाधीक वेग अहमदनगर तालुक्यात असून आज तेथील 243 जणांना संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. त्याखालोखाल संगमनेरातील 55, कोपरगावमधील 50, राहाता तालुक्यातील 39, अकोले व श्रीरामपूर तालुक्यातील प्रत्येकी 27, जामखेड तालुक्यातील 24, शेवगाव तालुक्यातील 21 तर उर्वरीत ठिकाणांहून 87 रुग्ण समोर आले आहेत. आज आढळून आलेली रुग्णसंख्या मार्च महिन्यातील उच्चांकी ठरली आहे.


जिल्हा मुख्यालया पाठोपाठ संगमनेर तालुक्यातील संक्रमणातही मोठी वाढ झाल्याचे दिसत असून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत असल्याने तालुक्याचा सरासरी रुग्णवाढीचा वेग आता थेट दररोज 41 रुग्णांवर पोहोचला आहे. आजही (ता.15) प्राप्त झालेल्या अहवालातून संगमनेर शहरातील 14 जणांसह तालुक्यातील एकूण 55 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्या संगमनेरातील मालदाड रोड परिसरातील 59 वर्षीय इसमासह, 50 वर्षीय महिला व 24 वर्षीय तरुण, याच परिसरातील आदर्श कालनीतील 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, रहेमतनगरमधील 43 वर्षीय तरुण, चैतन्यनगरमधील 32 वर्षीय तरुण, शिवाजी नगरमधील 34 वर्षीय तरुण, मेनरोडवरील 35 वर्षीय तरुण,


इंदिरानगरमधील 47 व 33 वर्षीय महिलेसह 26 वर्षीय तरुण व उच्चभ्रु वसाहत असलेल्या ऑरेंज कॉर्नरवरील 20 वर्षीय तरुणासह सात वर्षीय मुलगा व केवळ संगमनेर असा पत्ता असलेला 48 वर्षीय इसम. यासह ग्रामीण भागातील गणोरे येथील 56 वर्षीय इसम, सुकेवाडी येथील 66 वर्षीय महिलेसह 55 व 47 वर्षीय इसम व 37 वर्षीय तरुण, निमगाव जाळी येथील 55 वर्षीय इसमासह 35 वर्षीय तरुण, लोहारे रस्त्यावरील 55 वर्षीय महिला, वाघापूर येथील 56 वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथील 27 वर्षीय तरुण, अंभोरे येथील 30 वर्षीय महिला, निमगाव येथील 52 वर्षीय महिला, संगमनेर खुर्दमधील 57 वर्षीय इसमासह 75 व 30 वर्षीय महिला,


जवळे कडलग येथील 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमगाव बु. येथील 58 वर्षीय इसम, तळेगाव दिघे येथील 25 वर्षीय महिला, सारोळे पठार येथील 84 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, विठ्ठलनगर मधील (गुंजाळवाडी) 23 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथील 49 वर्षीय इसम, गोल्डन सिटीतील 31 वर्षीय तरुणासह 18 वर्षीय महिला, घारगाव येथील 38 वर्षीय तरुण, मंगळापूर येथील 24 वर्षीय महिला, आंबी खालसा येथील 35 वर्षीय तरुण, घुलेवाडी शिवारातील मालपाणी नगर मधील 42 वर्षीय महिला, मालदाड येथील 53 व 27 वर्षीय महिलांसह सात वर्षीय बालिका, कोकणगाव येथील 48 वर्षीय महिला व बटवाल मळा येथील 20 वर्षीय महिला अशा शहरातील चौदा व ग्रामीण भागातील 41 जणांसह तब्बल 55 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 7 हजार 424 झाली आहे. त्यातील 295 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत.

चालू महिन्याच्या प्रारंभापासूनच जिल्ह्यातील कोविडचे संक्रमण गतीमान झाले असून आजच्या स्थितीत जिल्ह्यात दररोज सरासरी 334 रुग्ण समोर येत आहेत. जिल्ह्यात सर्वाधीक रुग्णगती अहमदनगर तालुक्यात असून तेथे रोज 147 रुग्ण, त्या खालोखाल संगमनेर तालुक्यात 41 रुग्ण दररोज, राहाता तालुक्यात 37 रुग्ण, कोपरगाव तालुक्यात 21 रुग्ण, श्रीरामपूर तालुक्यात 16 रुग्ण, शेवगाव व पारनेर तालुक्यात 14 रुग्ण, राहुरी तालुक्यात 12 रुग्ण, अकोले तालुक्यात 11 रुग्ण, नेवासा तालुक्यात 10 रुग्ण, पाथर्डी तालुक्यात 9 रुग्ण, श्रीगोंदा व कर्जत तालुक्यात 7 रुग्ण, जामखेड तालुक्यात 6 रुग्ण तर लष्करी परिसरातून दररोज सरासरी 4 रुग्ण समोर येत आहेत.

Visits: 11 Today: 1 Total: 79758

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *