पांगरी येथे छावा संघटनेच्यावतीने साखळी उपोषण मराठा आरक्षणासह सरकारकडे केल्या विविध मागण्या


नायक वृत्तसेवा, सिन्नर
तालुक्यातील पांगरी येथे बुधवारी (ता.१३) छावा संघटनेच्यावतीने चक्काजाम आंदोलन झाल्यानंतर मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली. उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी येथे हजेरी लावली.

छावा संघटनेचे विलास पांगारकर यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन झाल्यानंतर येथील संत हरीबाबा मैदानात साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली. उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी येथे भजन गाऊन ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी झाले होते.

दुसर्‍या दिवशीच्या आंदोलनामध्ये विलास पांगारकर, रमेश पांगारकर, ज्ञानेश्वर पांगारकर, जगदीश पांगारकर, अतुल पांगारकर, सिन्नर बाजार समितीच्या संचालिका सुरेखा पांगारकर, पांडुरंग निरगुडे, संतोष पांगरकर, सुभाष पगार, दादा पांगारकर, रघुनाथ धुमाळ, सोमनाथ नन्नावरे, नंदा दळवी, मुक्ताबाई कलकत्ते, सुनील काटे, संपत पगार, निखील पांगारकर, विश्वास पांगारकर, रतनलाल अलिझाड, अशोक खजेकर, संदीप हिरे, सुनील चव्हाण, प्रकाश पांगारकर, चंद्रकांत दळवी, सोपान वारुळे, भाऊसाहेब बैरागी, अरुण पांगारकर, जीवन पांगारकर, सुरेश पांगरकर आदी सहभागी झाले.
मराठा समाजाला कुणबी दाखले मिळावे, सिन्नर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांचा चारा डेपो सुरू करा, भोजापूर धरणाचे पूर पाणी पूर्व भागातील धरणात सोडावे, टंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकरने पाणी पुरवठा करावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यापुढे हे आंदोलन असेच साखळी पद्धतीने सुरू राहणार असल्याचे पांगारकर यांनी सांगितले. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार. वेळ पडल्यास दोन ते तीन दिवसानंतर समृद्धी महामार्ग अडविला जाईल, असा इशाराही दिला आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 79576

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *