राज्यस्तरीय रोलर स्केटींग स्पर्धेत ध्रुव ग्लोबलचे यश पाच सुवर्णसह बावीस पदकांची कमाई; संभाजीनगरमध्ये झाल्या स्पर्धा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय रोलर स्केटींग स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने पदकांची लयलुट केली. स्पर्धेच्या विविध वयोगटात उत्कृष्ट प्रदर्शनाच्या बळावर ध्रुवच्या स्पर्धकांनी प्रत्येकी पाच सुवर्ण व रौप्य पदकांसह बारा कांस्यपदकांची कमाई करीत ही स्पर्धा गाजवली. महाराष्ट्र रोलर रेल स्केटींग असोसिएशन व रोलर स्केटींग ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले हाते.

स्पर्धेतील चार वर्षांखालील गटात परम भंडारी याने सुवर्ण खाते उघडताना एका सुवर्णसह कांस्यपदक मिळवले. तर, सहा वर्षांखालील गटात अन्वित चत्तर याने सुवर्ण पदक पटकावताना यशाची घोडदौड कायम राखली. दहा वर्षांखालील गटातही हर्षदीप कानवडे, रुद्र नाईकवाडी, आरव रहाणे, अथर्व देशमाने, रुद्र दळवी व वैष्णव डगळे यांनी सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांची लयलुट केली.

बारा वर्षांखालील गटात महंत पावबाके (कांस्य), आयुष कुराडे (एक रौप्य व एक कांस्य), आयुष धायगुडे (कांस्य), पुष्कर बकाल (एक रौप्य व एक कांस्य), प्रतीक बकाल (एक रौप्य व एक कांस्य), पृथ्वी राणा (कांस्य), सोहोम मेहेर (दोन कांस्य), शौर्य फटांगरे व सर्वेश जाधव यांनी प्रत्येकी एक कांस्यपदक पटकावतना शाळेच्या यशस्वी घोडदौडीला गती दिली. क्रीडा प्रशिक्षक ज्ञानेश्वर भोत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Visits: 152 Today: 2 Total: 1099395

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *