नगराध्यक्षा तांबे यांचे ‘पारंपारिक ओव्या’ पुस्तक प्रकाशित
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कुंटुबाची जबाबदारी, शहराचा कारभार, राजकारण, समाजसेवा, नागरिकांच्या समस्या यांसारख्या असंख्य भूमिका पार पाडत असताना आपल्या आवडीचा ओव्या लिहिण्याचा छंद जपत नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. नुकतेच या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे.
या पुस्तकाची पहिली आवृत्ती 2009 मध्ये प्रकाशित झाली. त्याची मागणी वाढत गेली. चार आवृत्त्यांनंतर 7 फेब्रुवारीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त पाचवी आवृत्ती प्रकाशित झाली. याकामी त्यांचे पती आमदार डॉ.सुधीर तांबे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ‘पारंपारिक ओव्या’ या पुस्तकात लेकीचा जन्म, खेळगाणी, लग्नाची चिंता, मागणी, वरमाई, बहीण-भाऊ, मायलेकी नाते, डोहाळे, बाळाचा जन्म, शेती, सण, समारंभ, माहेरची ओढ, उखाणे यांसारख्या असंख्य प्रकारच्या घटनांवर ओव्या ओळीबद्ध केल्या आहे. कवी बाबासाहेब सौदागर यांनी प्रस्तावना लिहिली असून गानसम्राज्ञी आशा भोसले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.