धरणांच्या पाणलोटातील पावसाचा जोर ओसरला पाडोशी पाठोपाठ सांगवीही ओव्हर फ्लो; आढळेचा साठा हलू लागला


नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या दोन दिवसांपासून पाणलोटात काहीसा जोर धरणार्‍या पावसाला बुधवारी काहीशी मरगळ आली. त्यामुळे धरणांमधील आवकही मंदावली असून आजही पावसाचे प्रमाण कमीच आहे. सध्या भंडारदरा धरणाची पाणी पातळी नियंत्रित केली जात असून आवक होत असल्याच्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. मुळा खोर्‍यासह मंगळवारी आढळा व भोजापूरच्या पाणलोटात कोसळणार्‍या जलधाराही आता आटल्या आहेत. मात्र या पावसाने आढळा खोर्‍यातील पाडोशी पाठोपाठ ७३ दशलक्ष घनफूट क्षमतेचा सांगवी लघु पाटबंधारे प्रकल्पही भरल्याने आढळा धरणातील पाणीसाठा हलू लागला आहे. गेल्या चोवीस तासांत या धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी ११ दशलक्ष घनफूटाची भर पडली असून एकूण पाणीसाठा ५२ टयांच्या पार गेला आहे.

यावर्षी वरुणराजाने लाभक्षेत्रासह प्रचंड पावसाचे आगार समजल्या जाणार्‍या मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या पाणलोटालाही प्रदीर्घ हुलकावणी दिली. मात्र गेल्यावर्षी उशिरापर्यंत खोळंबलेला पाऊस आणि त्यानंतरही अवकाळी, गारपीट यासारख्या कारणांनी कमी झालेल्या पाण्याच्या मागणीने यंदा मुळा, भंडारदरा व आढळा या चारही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे अधुनमधून कोसळणार्‍या पावसाने मुळा खोर्‍यातील छोटे-मोठे प्रकल्प ओसंडण्यासह मुळा धरणात ६ हजार ३९३ दशलक्ष घनफूट पाणीपातळी वाढवली. तर उत्तरेतील सात तालुयांसाठी वरदान ठरलेल्या भंडारदरा प्रकल्पातही या कालावधीत सर्वाधिक ६ हजार ९६४ दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले आहे.

एकीकडे पश्चिमेतील धरणांच्या पाणलोटात कमी-अधिक पाऊस सुरु असला तरी दुसरीकडे दुष्काळी भागांसाठी वरदान ठरलेल्या व अकोले, संगमनेर व सिन्नर (जि.नाशिक) तालुयातील जवळपास चार हजार हेटर क्षेत्र सिंचनाखाली आणणार्‍या आढळा व भोजापूर प्रकल्पांच्या परिसरात मात्र पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने एका डोळ्यात मोठी धरणं भरल्याचं हसू तर दुसर्‍या डोळ्यात अश्रू अशीही स्थिती निर्माण झाली होती. मात्र चालू आठवड्याच्या सुरुवातीलाच आढळा व भोजापूरच्या पाणलोटातही पाऊस सुरु झाला आहे. सद्यस्थितीत पावसाला जोर नसला तरीही या पावसाने आढळा खोर्‍यातील १४६ दशलक्ष घनफूट क्षमतेचा पाडोशी प्रकल्प मंगळवारी तर ७३ दशलक्ष घनफूट क्षमतेचा सांगवी प्रकल्प बुधवारी ओसंडला. त्यामुळे आढळा खोर्‍यातील पावसाचे पाणी आता आढळा धरणात जमा होवू लागले असून गेल्या दोन दिवसांत या धरणात १६ दशलक्ष घनफूटाची भर पडली आहे. भोजापूरच्या जलसाठ्यातही ४० दशलक्ष घनफूटाने वाढ झाली आहे.

आज सकाळी ६ वाजता संपलेल्या चोवीस तासांत घाटघर येथे सर्वाधिक १५५ मि.मी, रतनवाडीत ८३ मि.मी, पांजरे येथे ६९ मि.मी, भंडारदरा येथे ५७ मि.मी, वाकी येथे ३९ मि.मी, निळवंडे येथे दोन तर आढळा येथे तीन मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. चोवीस तासांत मुळा धरणात ४४८ दशलक्ष घनफूटाची भर पडून पाणीसाठा १४ हजार ९९६ दशलक्ष घनफूट (५७.६७ टक्के), भंडारदर्‍यात २७३ दशलक्ष पाण्याची आवक होवून साठा ९ हजार २१९ दशलक्ष घनफूट (८३.५१ टक्के), निळवंडे धरणात ३२२ दशलक्ष घनफूटाची भर पडून पाणीसाठा ४ हजार ५०१ दशलक्ष घनफूट (५४.०९ टक्के), आढळा धरणात ११ दशलक्ष घनफूटाने वाढ होवून ५५३ दशलक्ष घनफूट (५२.१६ टक्के) तर भोजापूर जलाशयात १३ दशलक्ष घनफूटाने वाढ होवून जलसाठा ७५ दशलक्ष घनफूट (२०.७८ टक्के) झाला आहे.


समन्यायी पाणी वाटपाच्या तरतुदीनुसार पाऊस सुरु असल्याच्या कालावधीत डोयावरील धरणांचे दरवाजे बंद करता येत नाहीत, मात्र असे केल्यास प्रादेशिक पाणी वाद निर्माण होण्याची दाट शयता असल्याने २०१२ साली या कायद्याची अंमलबजावणी सुरु होवूनही असा प्रकार आजवर पाळला गेलेला नाही. सध्या भंडारदरा धरण तीन ते चार दिवसांच्या पावसावर तर निळवंडे धरण आठवड्याच्या पावसावर भरु शकते. त्यानंतर भंडारदरा व निळवंडे या दोन्ही धरणांच्या पाणलोटातील आवक होणारे संपूर्ण पाणी नदीपात्रातून जायकवाडीकडे सोडले जाणार आहे.

Visits: 108 Today: 1 Total: 1101215

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *