‘अल्टो’ने सोळा वर्षांत चाळीस लाख विक्रीचा टप्पा गाठला
‘अल्टो’ने सोळा वर्षांत चाळीस लाख विक्रीचा टप्पा गाठला
नायक वृत्तसेवा, नगर
भारतातील 40 लाखांहून अधिक कुटुंबांमध्ये अभिमानाची भावना जागवणार्या भारतातील सर्वात आवडत्या अशा मारुती सुझुकी अल्टो गाडीने गेल्या 20 वर्षांपासून या क्षेत्रात अतुलनीय मापदंड स्थापित केले आहेत. अल्टो कुटुंबियांची अत्यंत लाडकी अशी ख्यातनाम अल्टो म्हणजे तरुण भारताच्या बदलत्या महत्त्वाकांक्षांप्रमाणे स्वत:मध्ये बदल घडवणारा एक ख्यातनाम ब्रँड अशी ओळख निर्माण केली असून सोळा वर्षांत चाळीस लाख विक्रीचा टप्पा गाठला आहे.
मारुती सुझुकी अल्टोमध्ये अनेक बदल झाले आहेत आणि गेल्या दोन दशकांमध्ये ही गाडी बरीच उत्क्रांत झाल्याने ती अधिक समकालीन, विविध वैशिष्ट्यांनी युक्त आणि ग्राहकांच्या बदलणार्या गरजांनुरुप बनली आहे. अल्टोमधील अनोखे वैशिष्ट्य म्हणजे यातील सुटसुटीत आकर्षक डिझाइन, सहज हाताळणी, उत्तम इंधन क्षमता, विकसित सुरक्षा, आरामदायी वैशिष्ट्ये आणि गाडी बाळगण्याचा अत्यंत कमी खर्च. आजघडीला पहिल्यांदाच गाडी घेण्याचा विचार करणार्या महत्त्वाकांक्षी ग्राहकांसाठी अल्टोमध्ये टचस्क्रीन स्मार्टप्ले इन्फोटेनमेंट सिस्टम, ईबीडी सह एबीएस, ड्यूएल टोन इंटेरिअर्स, ड्युएल एअरबॅग्स इत्यादी सुविधा आहेत. या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक (विपणन आणि विक्री) शशांक श्रीवास्तव म्हणाले, अल्टोने प्रत्येक नव्या अपग्रेडसह स्वत:मधील आकर्षकता वाढवली आहे आणि यामुळेच पहिल्यांदाच गाडी विकत घेणार्या ग्राहकांची ती प्राधान्यक्रमाची गाडी आहे. सर्व अल्टो ग्राहकांमधील 76 टक्के ग्राहकांनी 2019-20 मध्ये आपली पहिली गाडी म्हणून अल्टोची निवड केली आहे. हा आकडा चालू वर्षात 84 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. अल्टोला भारताच्या कानाकोपर्यातून प्रचंड लोकप्रियता लाभली आहे आणि आजही ही गाडी बहुसंख्य भारतीयांना प्रवासात साथ देते. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये अल्टोच्या विक्रीतील 59 टक्के वाटा देशाच्या दुर्गम बाजारपेठांचा होता आणि चालू वर्षात हा आकडा 62 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. प्राईड ऑफ इंडिया म्हणजेच भारताचा अभिमान अशी ओळख कमावलेल्या मारुती सुझुकी अल्टोने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपले स्थान निर्माण केले आहे. लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि दक्षिण आशियासह 40 हून अधिक बाजारपेठांमध्ये ही गाडी निर्यात करण्यात आली आहे.