दहावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याने गर्भवती राजूर पोलीस एकाविरुद्ध गुन्हा; घटनेने उडाली खळबळ


नायक वृत्तसेवा, राजूर
अकोले तालुक्यातील साकीरवाडी भागातील दहावीच्या वर्गात शिक्षण घेणारी अल्पवयीन विद्यार्थिनी चार महिन्यांची गरोदर असल्याची माहिती पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, सदर पीडित विद्यार्थिनी ही अकोले येथील विद्यालयात शिक्षण घेत आहे. 4 एप्रिल 2023 रोजी तिच्या पोटात दुखू लागल्याने तिने यावर उपचार करून गोळ्या औषधे घेतली. मात्र काही फरक न पडल्याने हा प्रकार आई व चुलते यांना सांगितला. त्यांनी देखील उपचार केले, परंतु काही फरक तर पडला नाही उलट वेदना वाढल्या. यामुळे तिला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांच्या तपासणीत ही विद्यार्थीनी चार महिन्यांची गरोदर असल्याची बाब पुढे आली.

या घटनेने मुलीच्या आईला मोठा धक्का बसला. या घटनेने तिची आई चक्रावून गेली. मात्र आपल्या मुलीवर झालेला अन्याय तिला खरंतर सहन झाला नाही. यामुळे याची पुढे शहानिशा केली असता एप्रिल 2023 मध्ये घरात घरात कुणी नसल्याचा फायदा घेऊन किसन नामदेव भांगरे (रा. साकीरवाडी, ता. अकोले) याने लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता त्याने वारंवार तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पोट दुखल्यामुळे ही बाब उघडकीस आली. याबाबत पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन किसन भांगरे याच्याविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Visits: 101 Today: 2 Total: 1111343

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *