दर्जेदार कामांतून नेवासा शहर व उपनगराचा चेहरामोहरा बदलू ः गडाख 3 कोटी 50 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन
नायक वृत्तसेवा, नेवासा
नेवासा नगरपंचायत अंतर्गत नेवासा शहरातील मंजूर झालेल्या सुमारे 3 कोटी 50 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांच्या हस्ते रविवारी (ता.31) करण्यात आले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, दर्जेदार कामांच्या माध्यमातून नेवासा शहर व उपनगराचा चेहरामोहराच बदलून टाकू.
नेवासा तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली व प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या नेवासा नगरपंचायतच्या माध्यमातून शहरातील रस्ता काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक, भुयारी गटारी अशा विविध विकास कामांचा शुभारंभ सुनीता गडाख यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये प्रभाग तीनमधील खळवाडी परिसर, एकमधील देशमुख गल्ली, बारामधील लोखंडे गल्ली, कामिनपीर, अकरामधील ज्ञानेश्वर मंदिर रस्ता ते अंतर्गत रस्ते, तरेामधील नुराणी मस्जिद व परिसरातील रस्ते, सोळामधील रामकृष्ण नगर, ज्ञानेश्वर मंदिर रस्ता परिसर, आठमधील गंगानगर परिसरातील रस्ते, दहामधील लक्ष्मीनगर परिसरात असलेले अंतर्गत रस्ते, सहामधील अहिल्यानगर आदी अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा व काही भागात भुयारी गटारींच्या कामांचा समावेश आहे.
याप्रसंगी नगराध्यक्षा योगिता पिंपळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, बाळासाहेब पाटील, सतीश पिंपळे, नगरसेविका अंबिका इरले, अंबादास इरले, अर्चना कुर्हे, जितेंद्र कुर्हे, फेरोजबी पठाण, नगरसेवक फारूक अत्तार, संदीप बेहळे, सचिन वडांगळे, मुळाचे संचालक नारायण लोखंडे, दिलीप जामदार, पोपट जिरे, अनिल ताके, बाळासाहेब पारखे, अंबादास लष्करे, सचिन कदम, सुलेमान मणियार, शोएब पठाण, नंदकिशोर खरात, गहिनीनाथ आढाव, जानकीराम डौले, अॅड.बाळासाहेब कराळे, शांताराम गायके, गणेश कोरेकर, किशोर गारूळे, भागवत जोशी, सतीश गायके, बजरंग इरले, अॅड.जावेद इनामदार यांच्यासह विविध प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
मंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा चेहरामोहरा कसा बदलेल असे दर्जेदार कामे कशी होतील. यासाठी प्रत्येक प्रभागातील नागरिकाने सहकार्याची भूमिका घेऊन चांगल्या कामाच्या पाठिशी रहावे. तसेच कामे दर्जेदार होण्यासाठी रहिवाशांनी देखील लक्ष घालावे. ठेकेदारांनी देखील कामात तडजोड न करता ते दर्जेदार कसे होतील यासाठी प्रयत्न करावा अशा सूचना सुनीता गडाख यांनी यावेळी बोलताना केल्या. पत्रकार सुधीर चव्हाण यांनी नऊ ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सतीश पिंपळे यांनी आभार मानले.