दुसऱ्याच्या चेहऱ्यावरील हास्य बघण्यात आनंद : मेजर सोनवणे

नायक वृत्तसेवा, तळेगाव दिघे
मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवेनंतर समाजसेवा व वारकरी संप्रदायाची सेवा करणे हे एकमेव उद्दिष्ट ठेवले आहे. माझ्या समाजाची,मातीची सेवा व विद्यार्थी हित जोपासण्याचे शेवटपर्यंत कार्य करणार आहे. आपण एखाद्याच्या कामी आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य बघण्यामध्ये मला सर्वाधिक आनंद वाटतो असे प्रतिपादन मेजर महेंद्र सोनवणे यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील मेजर महेंद्र चंद्रभान सोनवणे यांनी देश सेवेनंतर समाजसेवा करण्याचा निर्धार कृतीतून केला असून त्यांनी आत्तापर्यंत अनेकांना मदतीचा हात दिला आहे. देश सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी या मातीचे काही देणे लागते या भावनेतून समाजातील रंजल्या गांजल्या लोकांना मदत करून आधार दिला आहे. नुकतेच त्यांनी स्वातंत्र्यदिनी तळेगाव दिघे (घोडमाळ) तसेच तळेगाव दिघे येथील जिल्हा परिषदेच्या शाळांना साऊंड सिस्टीम भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. त्याचबरोबर निळवंडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे साहित्याची भेट दिली. मेजर महेंद्र सोनवणे यांनी सामाजिक बांधिलकीतून केलेल्या कार्याचा येथील ग्रामस्थांनी स्वीकार करत त्यांचा सत्कार करून आभार मानले.

तळेगाव दिघे येथील कार्यक्रमाला सचिन दिघे, नामदेव दादा दिघे, सुनील दिघे, राजेंद्र माळी, भाऊसाहेब दिघे, मेजर डॉ. नंदकुमार गोडगे, सोमनाथ दिघे, संतोष दिघे, शरद भागवत, माजी सरपंच रमेश दिघे, संपत्त दिघे,प्रभाकर कांदळकर,मुख्याध्यापक छबु गुलाब शिंदे,
राजेंद्र मुक्ताजी माळी,मुख्याध्यापक अशोक गडाख, शिक्षक ज्ञानदेव उकिर्डे, संदिप पोखरकर, वैशाली घुले, नंदा नवाळी, जमिला शेख, मनोहर यादव, संतोष दळे, दिपक क्षीरसागर, उज्वला शिंदे, काळू भांगरे, स्मिता गायकवाड, विशाल दिघे, तर निळवंडे येथे माजी सरपंच रायभान पवार, मच्छिंद्र पवार, प्रभाकर पवार,विकास पवार,सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिरडे, पोपट पवार,सुभाष पवार,उत्तम पवार,बाळासाहेब पवार,कीर्तीकुमार उकिरडे, रावसाहेब वारे,प्रसाद जोंधळे,शिवनाथ पवार,हेमंत पवार, मुख्याध्यापक श्रीकांत माघाडे, बाळासाहेब पवार, भाऊसाहेब पवार,चेअरमन सुभाष पवार, अक्षय ढोले, एम.बी.बढे, श्रीराम भांगरे, सुरेखा कडाळे, राजू साळवे, आशा जगताप आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

Visits: 100 Today: 1 Total: 1114864
