अभूतपूर्व! संगमनेरच्या रस्त्यांवर भगवे वादळ..!! शहर व ग्रामीण भागातील हजारोंची उपस्थिती; विविध मागण्यांसह लव्ह जिहाद विरोधात कायद्याची मागणी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या रविवारी जोर्वे गावातील तरुणांना संगमनेर शहरातील जोर्वेनाका येथे मारहाण झाल्यानंतर हिंदू समाजात मोठा रोष निर्माण झाला आहे. या घटनेचा निषेध करण्यासह लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याच्या मागणीसाठी आज शहरातून अभूतपूर्व मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संगमनेर शहरासह आसपासच्या ग्रामीण भागातील महिला तरुण व वृद्ध अशा सर्व श्रेणीतील हजारो हिंदू धर्मियांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे आज मुस्लिम बहुल विभाग वगळता शहरात उत्स्फूर्तपणे पाळण्यात आला.
सकल हिंदू समाजाच्या वतीने आज संगमनेर शहरातून भगवा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात संगमनेर शहरातील हजारो नागरिकांसह आसपासच्या ग्रामीण भागातील गावकरीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांच्या हातात असलेले वेगवेगळे फलक हिंदू समाजाचा आक्रोश दर्शविण्यासाठी पुरेसे होते. तर तरुणांकडून दिल्या जाणाऱ्या घोषणांनी अवघे संगमनेर दुमदुमून गेले होते. नगरपालिके पासून निघालेला हा मोर्चा बाजारपेठ सय्यदबाबा चौक, मेनरोड, चावडी, मोमीनपुरा मार्गे प्रशासकीय भवनाजवळ पोहोचला आहे. या ठिकाणी थोड्याच वेळात सभा होणार आहे.
Visits: 235 Today: 1 Total: 1957790

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *