संगमनेर तालुक्याने ओलांडले बाधितांचे 37 वे शतक..! शहरातील रुग्णसंख्येत घट तर, ग्रामीण भागातील संक्रमण पुन्हा वाढले..
नायक वृत्तसेवा संगमनेर
एक ऑक्टोबरपासून तालुक्यातील रुग्णवाढीची सरासरी घटलेली असताना शुक्रवारी शहरातील सतरा जणांसह तालुक्यातील एकूण 74 जणांचे अहवाल पॉझिटिव आले होते. वाढलेल्या या रुग्णसंख्येने तालुक्याने बाधितांचे 36 वे शतक ओलांडून 3 हजार 670 वर मजल मारली होती. आता आजही कालच्या तुलनेत काहीसा दिलासा देत 53 रुग्णांची भर पडली आहे. मात्र या रुग्णसंख्येने अवघ्या चोवीस तासांंतच तालुक्याला दुसऱ्या शतकाच्या पार नेत एकूण बाधितांची संख्या 3 हजार 723 वर पोहोचवली आहे.
या महिन्याच्या अगदी प्रारंभापासून संगमनेर शहरासह ग्रामीण भागातील रुग्णसंख्या काही प्रमाणात नियंत्रणात आली होती. त्यामुळे गेल्या महिन्यातील सरासरी 51 रुग्ण प्रति दिवस ही गती कमी होऊन 42.25 च्या गतीने रुग्ण समोर येऊ लागल्याने संगमनेरकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र गुरुवारी अचानक तालुक्यातील रुग्ण संख्येने उसळी घेतल्याने सरासरीचाही वेग वाढून तो 46.66 वर पोहोचला. रुग्णवाढीचा हा सिलसिला कायम राहिल्याने तालुक्याची सरासरी रुग्ण गती आजही वधारली असून आज सरासरी 47.3 या गतीने रुग्ण समोर आले आहेत. संगमनेरकरांसाठी हा धोक्याचा इशारा असून नागरिकांनी कोरोना संपला आहे असा गैरसमज करून नियमांकडे दुर्लक्ष केल्यास कमी होत चाललेला प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
आज संगमनेर शहरातील अशोक चौक परिसरातून नव्याने रुग्ण समोर आले आहेत. त्यात 38 वर्षीय महिलेसह 20 व 16 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. त्यासोबतच बाजारपेठेतून 21 वर्षीय तरुण, जानकीनगर मधून 43 व 17 वर्षीय महिला आणि नवीन नगर रोड परिसरातून 52 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. ग्रामीण भागात आज संगमनेर खुर्द मधून सर्वाधिक सात रुग्ण समोर आले. त्याखालोखाल शेडगाव, औरंगपूर, गुंजाळवाडी, घुलेवाडी, गुंजाळवाडी पठारवरूनही दोन पेक्षा अधिक रुग्ण समोर आले आहेत.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये शेडगाव मधील 80 वर्षीय इमासह 26 वर्षीय तरुण, तसेच 73, 45 व 20 वर्षीय महिला, पिंपरी येथील 32 वर्षीय महिला, हंगेवाडी येथील 70 वर्षीय महिला, चंदनापुरी येथील 33 वर्षीय तरुण, आनंदवाडी येथील 58 वर्षीय इसमासह 21 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथील 66 वर्षीय महिलेसह 26 वर्षीय तरुण, पेमगिरी येथील 27 वर्षीय तरुण, खराडी येथील 60 वर्षीय महिला, संगमनेर खुर्द मधील 48, 34, 32, 26 व 23 वर्षीय महिलांसह नऊ वर्षीय बालिका, तसेच 34 वर्षीय तरुण, कुरकुंडी येथील 65 वर्षीय इसम, औरंगपूर येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 43 वर्षीय तरुण, तसेच 42, 40 व 24 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 32 वर्षीय महिलेसह 24 वर्षीय तरुण, अकरा वर्षीय बालिका व पाच वर्षीय बालक,
गुंजाळवाडी पठार येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 33 वर्षीय महिला व 14 वर्षीय बालिका, कनोली येथील 34 वर्षीय तरुण, साकुर मधील 39 वर्षीय महिलेसह 45 व 32 वर्षीय तरुण, गुंजाळवाडी येथील 39 वर्षीय तरुणासह 35 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा व अकरा वर्षीय बालिका, महालवाडी येथील 53 वर्षीय इसम, सोनोशी येथील 60 वर्षीय महिला, झोळे येथील 51 व 28 वर्षीय महिलेसह हिवरगाव पावसा येथील 48 वर्षीय इसमाचा अहवाल संक्रमित आला आहे. तालुक्याच्या रुग्ण संख्येत आज 53 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याने बाधितांचे 37 वे शतकही पूर्ण करीत 3 हजार 723 रुग्णसंख्या गाठली आहे.