उसतोडणी कामगारांच्या दोन झोपड्या आगीत खाक मुळा कारखाना येथील घटना; सुरक्षा विभाग व ग्रामस्थांनी विझवली आग

नायक वृत्तसेवा, नेवासा
मुळा साखर कारखान्याच्या गट परिसरात राहत असलेल्या उसतोडणी कामगार राहत असलेल्या भागात मंगळवारी (ता.20) आग लागून दोन झोपड्या जळून खाक झाल्या. सुरक्षा विभाग व ग्रामस्थांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, गट परिसरातील गट नंबर 800/2 मध्ये पन्नासहून अधिक उसतोडणी कामगार राहतात. येथे सोमवारी सकाळी अकरा वाजता अचानक एका झोपडीला आग लागली. तेथील ग्रामस्थांनी कारखान्याच्या सुरक्षा विभागास खबर दिली. आगीत सतेज मोरे व हिरा जगदाळे (रा.उखळवाडी, जि.बीड) यांच्या दोन मोटारसायकली, धान्य, कपडे व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. बांधलेले जनावरे युवकांनी सोडून दिल्याने त्यांचा प्राण वाचला. मात्र, समाजातील दानशूरांनी पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे.

दरम्यान, ‘मुळा’चा अग्निशमन बंब तत्परतेने आल्याने मोठा अनर्थ टळला. सुरक्षाधिकारी प्रवीण चौधरी, कर्मचारी टी.बी.भाकड, बी.एन.घावटे, एन.ए.घावटे, आर.बी.जायगुडेंसह तेथील शेतकरी लक्ष्मण दरंदले, विष्णू दरंदले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र कुसळकर, नागेश गर्जे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

सुरक्षाधिकारी चौधरींचे सर्वत्र कौतुक..
बंधू नितीन चौधरी यांचे तीन दिवसांपूर्वी निधन झाले असताना दु:ख बाजूला ठेवून सुरक्षाधिकारी चौधरी यांनी घराच्या बाहेर पडत आग आटोक्यात आणण्यासाठी पुढाकार घेतला. अग्निशमन बंब व इतर ठिकाणचे पाणी उपलब्ध करुन इतर पन्नासहून अधिक झोपड्या आगीपासून वाचविल्या. या विशेष कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Visits: 15 Today: 2 Total: 119157

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *