तरुणाला दहा ते बारा जणांकडून मारहाण

तरुणाला दहा ते बारा जणांकडून मारहाण
नायक वृत्तसेवा, राहुरी
कर्जाचे हफ्ते न भरल्याने नोटरीद्वारे विकलेला डंपर परत आणण्यासाठी गेलेल्या मूळ मालकाच्या पुतण्यास दहा ते बारा जणांनी बेदम मारहाण करीत डांबून ठेवल्याची घटना राहुरीमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.


याबाबतची विजय बाळासाहेब वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, वाघ यांनी नारायण खंडागळे यांना डंपर विकला होता. डंपरवर श्रीराम फायनान्स कंपनीचे कर्ज आहे. त्यामुळे नोटरीत डंपरच्या कर्जाचे हफ्ते भरण्याची अट घातली होती. मात्र, खंडागळे यांनी हफ्ते भरले नाहीत. फायनान्स कंपनीने तगादा लावल्याने वाघ यांनी पुतण्या संजय सुरेश वाघ याला 30 सप्टेंबर रोजी डंपर आणण्यास पाठविले. पांढरीचा पूल येथून डंपर आणताना संजय वाघ याला आरोपी नारायण हरी खंडागळे, बद्रीनाथ खंडागळे (दोघेही रा.वांजोळी, ता.नेवासा), सरपंच थोरात, तसेच अनोळखी सात ते आठ जणांनी मारहाण केली. यावरुन पोलिसांनी वरील आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

Visits: 94 Today: 1 Total: 1101963

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *