श्रीरामपूरात फटाक्याच्या आवाजाच्या दुचाकी सुसाट
श्रीरामपूरात फटाक्याच्या आवाजाच्या दुचाकी सुसाट
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहतुकीची वर्दळ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वाढत्या वाहनांमुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणातही मोठी वाढ होत आहे. त्यात अधिक भर म्हणून की काय शहरात फटाक्याच्या आवाजाच्या दुचाक्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने शहरवासियांची डोकेदुखी वाढली आहे. सद्यस्थितीत 100 हून अधिक मोठ्या आवाजाच्या दुचाक्या भरधाव वेगाने धावताना दिसत आहे.

या संपूर्ण प्रकाराकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दुचाकीस्वारांचे चांगलेच फावत आहे. याचा फायदा उठवत बिनधास्तपणे शहरातील प्रमुख चौकात हे दुचाकीस्वार संचार करताना दिसत आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात असतानाही ते कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. यामुळे शहरवासियांची डोकेदुखी वाढली आहे. आता तरी पोलिसांनी जागे होऊन आवाज काढणार्या दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

