विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ः थोरात

नायक वृत्तसेवा, अकोले
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करुनच आपली वाटचाल करावी. त्यात शिक्षकांची भूमिका तितकीच महत्त्वाची असते. तेव्हाच विद्यार्थ्यांचा यशस्वीतेचा रस्ता सुकर होईल, असे प्रतिपादन विश्व हायटेक नर्सरीचे संचालक वीरेंद्र थोरात यांनी केले.

अकोले तालुक्यातील वीरगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात नुकताच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. याप्रसंगी जयवंत थोरात, आनंद थोरात, अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष सतीष नाईकवाडी, अगस्तिचे मुख्याध्यापक शिवाजी धुमाळ, चांगदेव वाकचौरे, बाळासाहेब अस्वले, दिनेश देशमुख, आबासाहेब थोरात, ग्रामपंचायत सदस्य वाल्मिक देशमुख, गणेश अस्वले, ज्ञानेश्वर वाकचौरे, भीमाशंकर मालुंजकर, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका भोईर, भाऊसाहेब चासकर आदी उपस्थित होते. यावेळी स्व. निलादेवी सीताराम थोरात यांच्या स्मरणार्थ जयवंत थोरात यांच्यातर्फे विद्यालयात दहावीमध्ये प्रथम आलेल्या राजेश्वरी चांगदेव वाकचौरे हिला दहा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. तसेच स्व. चंद्रकांत नानासाहेब थोरात यांच्या स्मरणार्थ नानासाहेब थोरात यांच्याकडून दहावीत मुलींमध्ये प्रथम आलेल्या राजेश्वरी चांगदवे वाकचौरे (गुण 93.60 टक्के) हिस दोन हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. तसेच मुलांमध्ये प्रथम आलेला विश्वराज कृष्णांगर थोरात (गुण 90.00 टक्के) यास दोन हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक आणि मुलींमध्ये द्वितीय आलेली वृषाली बाबासाहेब शिंदे (गुण 93.20 टक्के) हिला एक हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. याचबरोबर विद्यालयात तृतीत आलेली श्रेया पांडुरंग वाकचौरे (गुण 91.80 टक्के), चतुर्थ वेदश्री बाळासाहेब अस्वले (गुण 90.60 टक्के) यांचाही गौरव करण्यात आला. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदर्शन ढगे यांनी केले. सूत्रसंचालन एस. बी. वर्पे यांनी केले तर आभार पी. एल. दिघे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस. एम. वाकचौरे, पी. के. आरोटे, लिपीक आर. एम. हेंबाडे यांनी परिश्रम घेतले.
