सहकारमहर्षी थोरात कारखान्याच्या सन्मानाने सेवानिवृत्त कर्मचारी भारावले गळीत हंगामाची उत्साहात सांगता; आमदार थोरातांनी साधला आपुलकीने संवाद

नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एक तालुका एक परिवार ही संकल्पना राज्याला मिळाली आहे. ही परंपरा जोपासताना सहकारमहर्षी थोरात कारखान्याने सेवानिवृत्त कर्मचार्यांचा केलेला सन्मान आणि आदरातिथ्यामुळे हे 500 सेवानिवृत्त कर्मचारी भारावून गेले. अनेक दिवसांनी जुन्या सहकार्यांना भेटल्याने अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

संगमनेरातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022-23 गळीत हंगामाच्या सांगता समारंभ प्रसंगी आमदार बाळासाहेब थोरात, कांचन थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, दुर्गा तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे यांच्या हस्ते या सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाजीराव खेमनर, रणजीतसिंह देशमुख, लहानू गुंजाळ, आर. बी. रहाणे, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, इंद्रजीत थोरात, गणपत सांगळे, संपत डोंगरे, रामहरी कातोरे, सुनंदा जोर्वेकर, घुलेवाडीच्या सरपंच निर्मला राऊत, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी सर्व सेवानिवृत्त कर्मचार्यांना फेटा, शाल, अमृतमंथन, अमृतगाथा हे पुस्तक व 15 किलो साखर देऊन सन्मानित करण्यात आले.

वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या 100 कामगारांना सहकुटुंब सन्मानित करण्यात आले. तर इतर 400 कामगारांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. अनेक वर्षे एकत्र काम केलेले हे जुने सहकारी एकमेकांना भेटल्यानंतर जुन्या आठवणींमध्ये रमून गेले. अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले तर जुन्या आठवणी सांगताना प्रत्येकजण भारावून बोलत होता. यावेळी प्रत्येकाजवळ जाऊन प्रेमाने आपुलकीने संवाद साधत आमदार थोरात यांनी ज्येष्ठांचा सन्मान केला.
![]()
याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले, संगमनेर तालुका हे एक कुटुंब आहे. सहकारी संस्था आणि कारखान्यामुळे प्रत्येक कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील सर्व सहकारी व शैक्षणिक संस्था या राज्यात अग्रगण्य ठरल्या असून आज संगमनेर तालुका राज्यातील वैभवशाली तालुका म्हणून ओळखला जातोय. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे आपण सर्व कार्यकर्ते असून या तालुक्याच्या विकासात सर्वांचा सहभाग राहिला आहे. हीच परंपरा आपल्याला पुढे जोपासताना सर्वांनी विकासकामांच्या पाठिशी कायम भक्कम उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी अनेक सेवानिवृत्त कर्मचार्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी संचालक चंद्रकांत कडलग, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मीनानाथ वर्पे, इंद्रजीत खेमनर, संपत गोडगे, अभिजीत ढोले, भास्कर आरोटे, भाऊसाहेब शिंदे, तुषार दिघे, दादासाहेब कुटे, विनोद हासे, अनिल काळे, माणिक यादव, मंदा वाघ, रामदास वाघ, संभाजी वाकचौरे, मीरा शेटे, सचिव किरण कानवडे, अॅड. शरद गुंजाळ, भास्कर पानसरे आदिंसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.

आनंद क्लबची स्थापना..
सेवानिवृत्त कर्मचार्यांनी अनेक दिवस सहकारी संस्थांसाठी काम केलेले असते. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या काळात त्यांच्या जीवनात आनंद राहावा याकरीता एक आनंद क्लब स्थापन करून कर्मचार्यांच्या आरोग्याची काळजी, तपासणीकरीता एसएमबीटी हॉस्पिटलमार्फत स्वतंत्रपणे विभाग सुरू करून या कर्मचार्यांना सेवा देण्याची घोषणा आमदार बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली.
