महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचा तिळगूळ समारंभ उत्साहात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा उत्तर अहमदनगर जिल्हा, संगमनेर तालुका व शहर प्रांतिक तैलिक महासभा यांच्यावतीने नुकताच झालेला तिळगूळ समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा विभागीय अध्यक्षा विद्या करपे, नगरसेविका सोनाली शिंदे आदी उपस्थित होत्या.

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या सर्व महिला पदाधिकार्‍यांसह सदस्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. तसेच यानिमित्ताने महिलांच्या विविध स्पर्धाही पार पडल्या. संगीत खुर्ची व उखाणे स्पर्धेत ज्या महिलांनी सहभाग घेतला त्यांना नगराध्यक्षा तांबे, अध्यक्षा करपे व नगरसेविका शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षिसाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी तिळगूळ समारंभ आयोजनाचे महत्व सांगून पर्यावरणाचेही महत्वही नमूद केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून उत्तर अहमदनगर जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्षापदी मीनाक्षी पेंडभाजे, जिल्हा सचिवपदी अश्विनी वालझाडे, तालुकाध्यक्षपदी शोभा बनसोडे, शहराध्यक्षपदी मोहिनी वालझाडे यांची निवड करुन नियुक्ती पत्र देण्यात आले. वाण म्हणून तुळशी रोपांचे वाटप उत्तर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे उपाध्यक्ष प्रदीप कर्पे व संगीता कर्पे यांच्याकडून सर्व महिलांना करण्यात आले. या तिळगूळ समारंभकरिता मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ.कापरे, सौ.कान्होरे, रेखा करपे, अर्चना वालझाडेे, संगीता नंदकिशोर करपेे, कीर्ती भागवत, मनीषा वाकचौरेे, जयश्री वालझाडेे, अनिता खोंड, सुनीता कवाडेे, शांताबाई खोंड, सुवर्णा काळेे, मीरा वालझाडेे, मीरा गोविंद वालझाडेे, मंगल दुरगुडेे, राणी शिंदे, छाया भागवत, अश्विनी भागवत, सुभद्रा वालझाडे, मनीषा वालझाडे, सौ.कर्डिले, सौ.सोनवणे, मनीषा पाबळकर, मोहिनी शिंदे, सौ.गायकवाड, अनुराधा बनसोडे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा उत्तर नगर जिल्हा महिला आघाडी, संगमनेर तालुका व शहर महिला आघाडी पदाधिकार्‍यांसह सदस्य उपस्थित होते.

Visits: 158 Today: 2 Total: 1590645

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *