घाटघरमध्ये औषधी वनस्पतींच्या वापराची कार्यशाळा उत्साहात राज्यासह राज्याबाहेरील 60 व्यक्तींनी नोंदवला उत्स्फूर्त सहभाग


नायक वृत्तसेवा, राजूर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, वन्यजीव विभाग नाशिक, डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने औषधी वनस्पतींच्या वापरासंबंधीची कार्यशाळा इकोसिटी घाटघर येथे नुकतीच पार पडली. या कार्यशाळेत राज्यातून आणि राज्याबाहेरील एकूण 60 व्यक्तींनी सहभाग नोंदवला.

सदर कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. एस. आर. यादव यांनी अध्यक्षपद भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे हे उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी आयुर्वेदाचार्य डॉ. अशोक बाली यांनी औषधी वनस्पतींच्या वापरासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक डॉ. महेंद्र खाडे यांनी कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील औषधी वनस्पतींच्या उपलब्धतेविषयी व्याख्यान दिले. याशिवाय वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मसूर नंदीकर यांनी औषधी वनस्पतींची धार्मिक वापर आणि धार्मिक पार्श्वभूमी याबद्दलची माहिती सादर केली. 15-20 वैद्यांनी सोबत आणलेला झाडपाला, खोड, कंदमुळे यांचे प्रदर्शन भरवून वनस्पतींच्या वापराबाबत उपयुक्त माहिती दिली. याबरोबरच आयुर्वेदिक औषधी उत्पादक कंपनीच्या संस्थापक डॉ. विकास कांडेकर यांचेही ळेत मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विशेष म्हणजे कार्यशाळेत घाटणदेवी अभयारण्य परिसरातील हिरवा माळरान येथील घनदाट जंगलातील वनस्पतींची माहिती आणि अभ्यास प्रत्यक्ष भेटीद्वारे करण्यात आला. प्राचार्य डॉ. मोहन वामन यांनी वनस्पतींसंबंधीच्या माहितीचे आदान-प्रदान ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. या कार्यशाळेसाठी डॉ. डी. वाय. पाटील यूनिटेक सोसायचीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्री पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त डॉ. स्मिता पाटील, डॉ. यशराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तर या कार्यशाळा यशस्वीतेसाठी विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. मुकेश तिवारी, प्रा. सतीष ठाकूर, प्रा. वरवाडकर, प्रा. हेमल ढगे, डॉ. वर्षा निंबाळकर, प्रा. करिष्मा सय्यद, प्रा. संध्या पाटील, मयूर मुरकुटे, प्रा. खालिद शेख, नाथा झडे आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

Visits: 153 Today: 1 Total: 1415337

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *