राहाता येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी पोलिसांचा लाठीमार; आयोजकांनी कार्यक्रम पंधरा मिनिटे केला बंद


नायक वृत्तसेवा, राहाता
गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आलेली नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आणि गोंधळ हे ठरलेलं समीकरण बनत चालंल आहे. गौतमीच्या राहाता येथील कार्यक्रमात देखील प्रचंड गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला.

राहाता येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. यावेळी गौतमीचे नृत्य सुरू असताना जमलेल्या तरुणांनी हुल्लडबाजी करायला सुरूवात केली. त्यामुळे या तरुणांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. तसेत काही तरुणांनी नृत्य सुरू असताना गौतमीवर पैसे उधळल्याचा प्रकार समोर आला.

यानंतर हा कार्यक्रम पंधरा मिनिटे बंद करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. पण तरुणांची हुल्लडबाजी सुरूच राहिल्याने आयोजकांना कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. यानंतर पोलिसांनी जमलेल्या तरुणांवर लाठीचार्ज करत त्यांना कार्यक्रम स्थळावरून हुसकावून लावलं. तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे हा कार्यक्रम वेळेपूर्वीच आटोपता घ्यावा लागला. इतकेच नाही तर यानंतर देखील काही प्रेक्षकांनी गौतमी गाडीत बसत असताना तिच्या गाडीला घेराव घालत गोंधळ घातला. अखेर बाउन्सर आणि पोलिसांच्या गराड्यात गौतमी पाटील कार्यक्रम स्थळावरून बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले.

Visits: 109 Today: 1 Total: 1109216

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *