निपाणी वडगावमध्ये दरोडा; साडेनऊ तोळे सोने व दीड लाख लुटले

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील निपाणी वडगाव येथील दौंड वस्ती परिसरात माजी सरपंच यांच्या घरात घुसून रात्री दोन ते अडीचच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत आणि घरातील व्यक्तींना वेठीस धरत साडेनऊ तोळे सोने व 1 लाख 35 हजार रोकड लुटली आहे. या घटनेने परिसरात कमालीची भीती पसरली आहे.

माजी वनाधिकारी सुरेश दौंड आणि निपाणी वडगावचे माजी सरपंच आशिष दौंड यांच्या घरावर हा दरोडा पडला. त्यांनी तत्काळ ही माहिती परिसरातील नातेवाईकांना फोनवरून कळविली. त्यानंतर नातेवाईक व शेजारच्यांच्या मदतीने दरोडेखोरांचा शोध घेतला असता त्यांनी घटनास्थळावरुन धूम ठोकली. नंतर ही माहिती शहर पोलिसांना कळविली. या घटनेची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ. दीपाली काळे, पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे, पोलीस नाईक संजय दुधाडे, दत्तात्रय दिघे, पोलीस शिपाई किरण पवार, किशोर जाधव, सुनील दिघे, पंकज गोसावी, राहुल नरवडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संजय दुधाडे हे करत आहे.

Visits: 26 Today: 1 Total: 115498

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *