अहमदनगरचा सुदर्शन कोतकर ठरला ‘नेवासा श्री’चा मानकरी उस्मानाबादच्या नागेश शिंदेला चितपट करत पटकावली गदा
नायक वृत्तसेवा, नेवासा
येथील ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रा उत्सवानिमित्ताने आयोजित कुस्त्यांच्या जंगी हगाम्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात अहमदनगरचा सुदर्शन कोतकर नेवासा श्रीचा व चांदीच्या गदाचा मानकरी ठरला. त्याने उस्मानाबादच्या नागेश शिंदे या मल्लाला चितपट करत मानाची गदा व 31000 हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.
नेवासा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात कुस्त्यांच्या जंगी हगाम्यांचे आयोजन यात्रा कमिटीच्यावतीने करण्यात आले होते. या स्पर्धेचे संजय सुखदान यांनी उत्कृष्टपणे नियोजन करत नेतृत्व केले. लहानांपासून मोठ्यापर्यंत मल्ल या हगाम्यात सहभागी झाले होते. दुसर्या क्रमांकात झालेल्या स्पर्धेत अनिल ब्राम्हणे या मल्लाने प्रतिस्पर्धी पैलवानला चितपट करत 15 हजार रुपये व मानाचे सन्मानचिन्ह पटकावले. तिसर्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये सागर कोल्हे या मल्लाने प्रतिस्पर्धी पैलवानला चितपट करत 15 हजार रुपये व मानाचे सन्मानचिन्ह पटकावले. तिसर्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये अण्णा गायकवाड याने प्रतिस्पर्धी पैलवानला चितपट करत 15 रुपये व मानाचे सन्मानचिन्ह पटकावले.
तर चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये सागर कोल्हे या मल्लाने प्रतिस्पर्धी पैलवानला चितपट करत 15 रुपये व मानाचे सन्मानचिन्ह पटकावले. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये त्रिमूर्तीच्या योगेश चंदेल या मल्लाने प्रतिस्पर्धी पैलवानला चितपट करत 15 हजार रुपये व मानाचे सन्मानचिन्ह पटकावले. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये त्रिमूर्तीच्या यूवराज खोपडे याने प्रतिस्पर्धी पैलवानला चितपट करत 15 हजार रुपये व मानाचे सन्मानचिन्ह पटकावले. पंच म्हणून राष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. संभाजी निकाळजे, सुरेश लव्हाटे, सुनील शिंदे, संदीप कर्डिले यांनी काम पाहिले. राजेंद्र देवकाते व अशोक गाडे यांनी समालोचन करत सर्वांना उत्साहित ठेवले.