आदिवासी विकासमंत्र्यांच्या घरावर 10 फेब्रुवारीला मोर्चा! अहमदनगर जिल्ह्यातून मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार


नायक वृत्तसेवा, अकोले
आदिवासी प्रश्नांसाठी 10 फेब्रुवारी रोजी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचच्यावतीने आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या नंदुरबार निवासस्थानी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहुरी, कोपरगाव व पारनेर तालुक्यातून श्रमिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होणार आहेत.

बोगस आदिवासींची घुसखोरी, आश्रमशाळा, वसतिगृहे व शिक्षणाचे प्रश्न, वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष, बाळहिरडा व इतर वन उपज यांच्या हमीभावाचा प्रश्न, आदिवासी श्रमिकांची बेरोजगारी आणि कुपोषणाचा प्रश्न, आदिवासी वाड्या-पाड्यांवर आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, नागरी सुविधा उपलब्ध करण्याचा प्रश्न अशा असंख्य समस्यांनी आदिवासी समुदाय त्रस्त झाला आहे.

या सर्व गोष्टींकडे महाराष्ट्र शासन दुर्लक्ष करत आहे. तसेच आदिवासी विकास मंत्री आदिवासींच्या विकासाची भूमिका घेण्याऐवजी आदिवासीविरोधी भूमिका घेत आहेत. त्यामुळे त्याचा आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना जाब विचारण्यासाठी शुक्रवार, दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी नंदुरबार येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या मोर्चात पूर्ण ताकदीने सामील व्हावे असे आवाहन नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, एकनाथ गिर्‍हे, राजाराम गंभीरे, तुळशीराम कातोरे आदिंनी केले आहे.

Visits: 111 Today: 2 Total: 1115718

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *