पालकमंत्री विखे पाटलांमुळे संगमनेरात विकासाची नांदी ः कानवडे संगमनेर तालुक्याला 6 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या चाळीस वर्षांपासून संगमनेर तालुक्यातील बहुतांश गावं विकासापासून वंचित उपेक्षित राहिली होती. या गावांना महसूल, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भरघोस निधी मंजूर करुन न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांनी पालकमंत्री पदाची धुरा हाती घेताच संगमनेर तालुक्यात विकासाची नांदी सुरू केली आहे, असे गौरवोद्गार भारतीय जनता पक्षाचे संगमनेर तालुकाध्यक्ष सतीश कानवडे यांनी काढले.

अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील विविध गावांना विविध विकासकामांसाठी 6 कोटी 80 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. क वर्ग तीर्थक्षेत्राकरिता 1 कोटी 5 लाख रुपये, अंगणवाडी इमारतींना 45 लाख रुपये, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोल्यांना 1 कोटी, जनसुविधा योजनेअंतर्गत 56 लाख रुपये, नागरी सुविधा योजनेअंतर्गत 19 लाख रुपये, रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण कामांकरीता 3 कोटी 10 लाख रुपये निधीस मंजुरी देण्यात आली आहे.

धांदरफळ बुद्रुक गटातील कौठे धांदरफळ गावात अंगणवाडी इमारत, घुलेवाडी गटातील वेल्हाळे गावात पिंपळमळा येथे अंगणवाडी इमारत, संगमनेर-खुर्द गटातील पिंपळगाव माथा गावातील ठाकरवाडी वस्तीवर अंगणवाडी इमारत, वडगाव पान गटातील निळवंडे गावात अंगणवाडी इमारतींकरीता प्रत्येकी 11.25 लाख रुपये अशा एकूण 45 लाख रुपये निधीस मंजुरी दिली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या 8 खोल्यांसाठी 1 कोटी मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये जांभुळवाडी 1 खोली, तळेगाव 1 खोली, शेळकेवाडी (बोटा) 1 खोली, काससावाडी, सुकेवाडी 1 खोली, ऊर्दु माध्यम शाळा साकूर 1 खोली, राजापूर (देशमुख खतोडे आखाडा) यासाठी प्रत्येकी 12.50 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. तर पोखरी हवेलीतील 2 खोल्यांकरीता 25 लाख रुपये निधी मंजूर केला आहे.

जनसुविधा योजनेअंतर्गत 56 लाख रुपये निधीस मंजुरी देण्यात आली आहे. संगमनेर खुर्द गटातील मेंगाळवाडीमध्ये पेव्हिंग ब्लॉककरीता 4 लाख रुपये, निमगाव खुर्द दशक्रिया विधी घाट सुशोभीकरणकरीता 4 लाख रुपये, सावरगाव तळ स्मशानभूमीत पेव्हिंग ब्लॉककरीता 2 लाख रुपये, निमोण गावात दशक्रिया विधी घाटावर पेव्हिंग ब्लॉककरीता 4 लाख रुपये, निळवंडे स्मशानभूमीसाठी 4 लाख रुपये, चिंचोली गुरव गावात पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्र 4 लाख रुपये, आंबीखालसा गावात सुशोभीकरणाकरीता 2 लाख रुपये, सावरगाव घुले गावात सुशोभीकरणाकरीता 3 लाख रुपये, पोखरी बाळेश्वर सुशोभीकरणकरीता 2 लाख रुपये, जवळे बाळेश्वर सुशोभीकरणाकरीता 2 लाख रुपये, वडगाव लांडगा ग्रामपंचायत परिसर सुशोभीकरणकरीता 4 लाख रुपये, चिकणी येथील स्मशानभूमी सुशोभीकरणाकरीता 4 लाख रुपये, गुंजाळवाडी स्मशानभूमी सुशोभीकरणाकरीता 5 लाख रुपये, वेल्हाळे स्मशानभूमी सुशोभीकरणाकरीता 3 लाख रुपये, कासारा दुमाला गावात सोलर लॅम्पकरीता 2 लाख रुपये, डोळासणेतील भैरवनाथ मंदिर परिसर सुशोभीकरणाकरीता 4 लाख रुपये, खंडेरायवाडी स्मशानभूमी सुशोभीकरणकरीता 4 लाख रुपये असा एकूण 56 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नागरी सुविधा अंतर्गत चंदनापुरी गावातील श्री साई बाबा मंदिर परिसर स्वच्छतागृह व स्नानगृहकरीता 12 लाख रुपये, साकूर गावठाणात सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्ती सोयीकरीता 7 लाख रुपये असा 19 लाख रुपये निधी मंजूर केला आहे.

Visits: 9 Today: 1 Total: 82667

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *