गिडेगाव शिवारात बंदी असलेले दीड टन मांगूर मासे जप्त पाच लाखांचा मुद्देमाल जप्त; नेवासा पोलिसांत गुन्हा दाखल


नायक वृत्तसेवा, नेवासा
शासनाने बंदी घातलेले दीड टन वजनाचे तीन लाख रुपये किमतीचे मांगूर जातीचे मासे व पिकअप जीप नेवासा पोलिसांनी गिडेगाव शिवारातून जप्त केली आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

3 जानेवारी, 2023 रोजी सायंकाळी सव्वाचार वाजेच्या सुमारास गिडेगाव येथे अमोल सुदाम म्हस्के (वय 28, रा. गोगलगाव, ता. नेवासा) तसेच शालिद मंगलभीम गायकवाड (वय 21, रा. गारखेडा, ता. जामनेर, जि. जळगाव) हे दोघे पिकअपमध्ये (क्र. एमएच,17, एजे.6575) मागील भागात ताडपत्रीमध्ये असलेले पाणी व त्यातील अंदाजे दीड टन वजनाचे शासनाने प्रतिबंध केलेले मांगूर जातीचे जिवंत मासे 150 रुपये किलो दराचे (एकूण किंमत तीन लाख रुपये) घेऊन चालले होते.

पोलिसांनी आरोपींना मासे कुठे घेवून जात आहात? असे विचारले असता त्यांनी भिगवण (ता. इंदापूर, जि.पुणे) येथे विक्री करण्यासाठी घेवून जात आहोत असे सांगितले. तत्पूर्वी मत्स्य विकास विभागाच्या सहायक अधिकारी प्रतीक्षा पाटेकर, कनिष्ठ लिपीक शीतल खेडकर, सहकारी अधिकारी दत्तात्रय मिसळ यांना पाचारण करुन माशांबाबत खात्री केली असता पर्यावरणाला धोका निर्माण करणारे असल्याने त्याची विक्री व वाहतूक बंदी असलेले मांगूर जातीचे मासे असल्याचा अभिप्राय त्यांनी दिला. त्यामुळे पोलिसांनी सदर पिकअप पकडून अंदाजे 5 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर माशांची खड्डा खोदून विल्हेवाट लावली आहे. याबबात पोलीस शिपाई रामचंद्र वैद्य यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील दोघांवर भारतीय दंडविधान कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

Visits: 271 Today: 1 Total: 2124095

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *