शेवगावमध्ये महावितरणकडून अघोषित भारनियमन

शेवगावमध्ये महावितरणकडून अघोषित भारनियमन
नायक वृत्तसेवा, शेवगाव
शहरासह तालुक्यात सध्या महावितरणकडून अघोषित भारनियमन सुरू आहे. यामुळे तासन्तास शहरातील वीज गायब होत असल्याने नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे.


दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून महावितरणच्या उपकेंद्राचा संपर्क क्रमांक बंद आहे. तर कर्मचारी अथवा अधिकार्‍यांना संपर्क केल्यास ते उडवाउडवीची उत्तरे देतात. यावरुन कधी जुन्या शेवगावात तर कधी उपनगरात कायम वीज गायब असल्याचे दिसते. या अघोषित भारनियमनामुळे अनेक व्यापारी, गृहिणी यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यात भर म्हणून की काय टाळेबंदीनंतर ग्राहकांना सरासरीनुसार डोळे पांढरे करणारी बिले महावितरणने दिली आहेत. एकीकडे राज्य सरकार बील माफ करण्याची घोषणा करत असताना दुसरीकडे महावितरणकडून बील भरण्याचे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. याबाबत शेतकरी संघटना, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि मनसे यांनी वाढीव वीज बिलांच्या विरोधात आंदोलने केली होती. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. महावितरणच्या या भोंगळ कारभाराला जनता पुरती वैतागली असून आंदोलनाचा पावित्र्यात आहे.

Visits: 12 Today: 1 Total: 79663

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *