प्रायोगिक तत्त्वावर शेतकर्यांना दिवसा आठ तास वीज ः तनपुरे
प्रायोगिक तत्त्वावर शेतकर्यांना दिवसा आठ तास वीज ः तनपुरे
नायक वृत्तसेवा, राहुरी
राज्य सरकारने नवीन कृषी धोरणात सौर ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कार्यान्वित सौरऊर्जा प्रकल्पांच्या ठिकाणी कृषीपंपाचे भार असलेल्या राज्यातील 68 उच्चदाब वीज वाहिन्यांवर प्रायोगिक तत्त्वावर शेतकर्यांना दिवसा आठ तास वीज देण्यास राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबरपासून सुरुवात केली, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

राहुरी खुर्द येथे मुळा नदीकाठी घाट बांधून स्मशानभूमीची विकास कामे, शनि शिंगणापूर रस्ता ते शेडगे वस्ती रस्त्याचे खडीकरण कामाचे उद्घाटनप्रसंगी मंत्री तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच पिरताजी चोपडे होते. राष्ट्रवादी महिला प्रदेश उपाध्यक्ष निर्मला मालपाणी, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, बाळासाहेब हराळ, गोविंद मोकाटे, माजी सरपंच इमाम शेख, मच्छिंद्र पवार, तनपुरे कारखान्याचे संचालक नंदकुमार डोळस, अय्युब पठाण, भास्कर तोडमल, गंगाधर शेडगे, पुंजा आघाव, रामा तोडमल, मछिंद्र पाटोळे, बाबासाहेब शेडगे, ज्ञानदेव तोडमल, अशोक शेटे, बाबासाहेब धोंडे उपस्थित होते.

