श्यामधीरज व आधारची चळवळ प्रेरणादायी ः आ. डॉ. तांबे महारक्तदान शिबिरात 205 दात्यांनी निभावले राष्ट्रीय कर्तव्य


नायक वृत्तसेवा, संगमनेर
रक्तदान हे श्रेष्ठदान असून संकट काळात अपघातसमयी रुग्णांना तातडीने रक्ताची गरज भासते. रक्तदानाशिवाय रुग्णांना रक्त उपलब्ध होऊ शकत नाही. रक्तदान चळवळीमुळे अनेकांचे प्राण वाचतात. अर्थात रक्तदान हे एक पवित्र कार्य आहे. यादृष्टीने श्यामधीरज सेवाभावी संस्था व आधार फाउंडेशन यांची सातत्यपूर्ण असणारी रक्तदान चळवळ सर्वांना अत्यंत प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले.

संगमनेरमधील आधार फाउंडेशनच्या कार्यालयात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोल होते. या शिबिराचे उद्घाटन संगमनेर टेक्सटाईल मार्केटचे संचालक चेतन राजपाल, ज्येष्ठ पत्रकार किसन हासे, सह्याद्री अकॅडेमीचे संचालक अमोल रहाणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे, आधार फाउंडेशनचे समन्वयक डॉ. महादेव अरगडे, विठ्ठल कडूसकर, डॉ. विजय पवार, अर्पण ब्लड बँकेचे नयन जैन, शिवव्याख्याते दीपक कर्पे, प्राचार्य एम. वाय. दिघे, पी. आर. शिंदे, अमोल गुंजाळ, पांडुरंग घनवट, दगडू अरगडे, शारदा अरगडे, प्रकाश अरगडे, डॉ. सुधाकर पेटकर आदिंसह रक्तदाते उपस्थित होते.

स्वर्गीय धीरज महादेव अरगडेच्या स्मृतीप्रित्यर्थ महारक्तदान शिबिराचे आयोजन सलग पंधरा वर्षांपासून केले जात आहे. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आधार फाउंडेशनचे समन्वयक पी. डी. सोनवणे, लक्ष्मण कोते, तानाजी आंधळे, महेश जगताप, छाया रहाणे, समीर फापाळे, संतोष शेळके, वसंत सोनवणे, रामराव कडलग, सतीश कुर्‍हे, भाऊसाहेब गुंजाळ, डॉ. समर्थ अरगडे, आचार्य डी. टी. गुंजाळ, किरण गुंजाळ, उत्तम देशमुख, निवृत्ती शिर्के, अतुल अभंग, राजेश तिटमे, संजय मंडलिक, वाल्मिक चौधरी, अर्पण ब्लड बँकेच्या कार्यवाहक प्रमिला कडलग, मुकुंद डांगे, सखाराम तळपाडे, नामदेव सानप, श्रीकांत बिडवे यांनी विशेष प्रयत्न केले. तर संगमनेर साहित्य परिषद, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवा संघ निमज, समर्थ तरुण मित्रमंडळ, शिवराज रायकर संगमनेर, अर्पण ब्लड बँक संगमनेर, संगम संस्कृती संगमनेर, अर्चित कष्ट कन्सल्टन्सी, सिद्धकला महाविद्यालय, संजीवनी आयुर्वेद कॉलेज, वामनराव इथापे होमिओपॅथी कॉलेज आदी संस्थांचे विशेष सहकार्य लाभले. प्रास्ताविक फाउंडेशनचे समन्वयक सुखदेव इल्हे यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब पिंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सोमनाथ मदने यांनी केले.

205 रक्त पिशव्यांचे संकलन…
या रक्तदान शिबिरामध्ये 205 दात्यांनी रक्तदान करुन राष्ट्रीय कर्तव्य निभावले. यात 20 महिलांनी सहभाग घेतला होता तर सहा दाम्पत्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे रक्तमित्र सचिन गिरी 134 वेळा, त्र्यंबक शिंदे 96 वेळा तर सुखदेव इल्हे यांनी 91 वेळा रक्तदान केले.

Visits: 3 Today: 1 Total: 21025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *