भाजप भटके विमुक्त सोशल मीडिया संयोजकपदी कडनर

भाजप भटके विमुक्त सोशल मीडिया संयोजकपदी कडनर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडी सोशल मीडिया संयोजकपदी संगमनेर तालुक्यातील कोंडाजी कडनर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयाचे सचिव मुकूंद कुलकर्णी यांनी तसे नियुक्ती पत्र प्रसिद्धी माध्यमांना दिले आहे.


महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडीचे संयोजक माजी आमदार नरेंद्र पवार, सहसंयोजक अशोक चोरमले यांनी भ्रमणध्वनीवरुन माहिती देऊन अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कोंडाजी कडनर हे एका वृत्तवाहिनीचे संस्थापक संपादक आहेत. पत्रकारिता क्षेत्रात व सोशल मीडियावर मजबूत पकड असलेले युवा कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. यशवंत युवासेनेच्या अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी काही वर्षे पार पाडली आहे. अनेक वर्षांपासून भाजपमध्ये निष्ठेने काम करत असून भटके विमुक्तांच्या विविध समस्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या याच अलौकिक कार्याची दखल घेवून त्यांच्याकडे भाजप महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडी सोशल मीडिया संयोजकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निवडीबद्दल माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे, माजी आमदार वैभव पिचड, शिवाजी कर्डिले, प्रा.राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, संगमनेर तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, अकोले तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंजाळ, अकोले सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, रंगनाथ सोडनर, रयत संघटना तालुकाध्यक्ष भिवा सोन्नर, युवामोर्चा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, बाबुराव खेमनर, नवनाथ वावरे, सूरजीत खेमनर, मालुंजे सरपंच संदीप घुगे, अ‍ॅड.शंकर खेमनर, अ‍ॅड.संदीप जगनर, मच्छिंद्र शेरमाळे, किशोर कडनर, अशोक खेमनर, शैलेश फटांगरे, केशव दवंगे, विकास गुळवे, सोमनाथ कडनर, सचिन कडनर व बहुसंख्य हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Visits: 3 Today: 1 Total: 23151

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *