संगमनेर तालुका भाजपकडून बैठकांचा सिलसिला तालुकाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बुथप्रमुखांची आढावा बैठक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतीय जनता पक्ष संगमनेर तालुका बुथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुखांची आढावा बैठक नुकतीच नूतन तालुकाध्यक्ष सतीष कानवडे यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी असोसिएशन सभागृहात शुक्रवारी (ता.18) संपन्न झाली आहे.

राज्याचे महसूल, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या संघटनात्मक संरचनेच्या आदेशानुसार बैठकांचे आयोजन सुरू झाले आहे. या बैठकीस संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावातील बुथप्रमुख व शक्ती केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकाध्यक्ष सतीष कानवडे यांनी बुथप्रमुखांचा आढावा घेताना 37 ग्रामपंचायत निवडणुकीत पूर्ण ताकदीने पॅनल उभा करून लढत द्यावी. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकविण्याचा निर्धार कानवडे यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी देखील कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असेही म्हटले आहे.

नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष पदाचा कार्यभार हाती घेताच सतीष कानवडे यांनी संपूर्ण तालुका पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. पंचायत समिती गणनिहाय बैठकांचे सत्र सुरू केले आहे. यामुळे कार्यकर्त्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रशासकीय अधिकार्यांशी कामांसाठी संवाद साधून नागरिकांची कामे मार्गी लावण्यामुळे अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष कानवडे यांची काम करण्याची लकब पाहून कौतुकाचा वर्षाव केला आहे. बुथप्रमुखांनी आपापल्या गावातील विविध समस्या तालुकाध्यक्ष सतीष कानवडे यांच्या समोर मांडल्या असत्या त्यास सकारात्मक प्रतिसाद देत चर्चा करण्यात आली. तसेच 27 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा थेट प्रक्षेपण कार्यक्रम प्रत्येक बुथवर आयोजित करावा असे आवाहनही कानवडे यांनी केले आहे. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, ज्येष्ठ नेते रामभाऊ जाजू, माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, सुधाकर गुंजाळ, हरिश्चंद्र चकोर, नानासाहेब खुळे, हाफीज शेख, पुंजा दिघे, शैलेश पटांगरे, गोपीनाथ रुपवते, भागवत दिघे, सोमनाथ आरोटे, लहानू नवले, रवींद्र देशमुख, मधुकर वाळे, नामदेव दिघे, बाळासाहेब शेटे, कोंडाजी कडनर, विकास गुळवे, संदीप घुगे, सूरजीत खेमनर, प्रेम इस्टे, संपत कानवडे, सागर कानवडे, गोरख डोंगरे आदी पदाधिकार्यांसह बुथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
