श्रीरामपूर शहरातील गावठी दारु अड्ड्यांवर छापेमारी चार महिलांविरुद्ध कारवाई; 1 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहर व परिसरात नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने हातभट्टीची गावठी दारु बनविण्याच्या चार ठिकाणी छापे टाकून 4 आरोपींविरुध्द कारवाई करत सुमारे 1 लाख 45 हजार रुपये किंमतीची साधने, 2 हजार 300 लिटर कच्चे रसायन व 300 लिटर तयार दारु नष्ट केली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी गुन्हे शाखेतील पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, आकाश काळे, शिवाजी ढाकणे, महिला पोलीस कॉन्स्टेबल ज्योती शिंदे, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल अंबादास पालवे या पथकाने सरस्वती कॉलनीमधील दोन ठिकाणी त्यानंतर भैरवनाथनगर येथे दोन ठिकाणी अशा चार गावठी हातभट्टी दारु बनविण्याच्या ठिकाणी छापे टाकून हे दारु अड्डे उद्ध्वस्त करुन गावठी हातभट्टी दारु व त्याचे कच्चे रसायन नष्ट केले.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुरनं. 989/2022 नुसार एका महिलेविरुध्द मुं. प्रो. अ‍ॅ. कलम 65 (ई) (फ) अन्वये गुन्हा दाखल करुन पोलिसांनी या ठिकाणाहून 25 हजार रुपये किंमतीचे 500 लिटर कच्चे रसायन 10 हजार रुपये किंमतीची 100 लिटर तयार दारु नष्ट केली. दुसर्‍या फिर्यादीत गुरनं. 990/2022 नुसार एका महिलेविरुध्द मुं. प्रो. अ‍ॅ. कलम 65 (ई)(फ)अन्वये गुन्हा दाखल करुन 25 हजार रुपये किंमतीचे 500 लिटर कच्चे रसायन 5 हजार रुपये किंमतीची 50 लिटर तयार दारु नष्ट केली. तिसर्‍या फिर्यादीत गुरनं. 991/2022 नुसार एका महिलेविरुध्द मुं. प्रो. अ‍ॅ. कलम 65 (ई)(फ) गुन्हा दाखल करत याठिकाणाहून 40 हजार रुपये किंमतीचे 800 लिटर कच्चे रसायन 10 हजार रुपये किंमतीची 100 लिटर तयार दारु नष्ट केली आहे. चौथ्या फिर्यादीत गुरनं. 992/2022 नुसार एका महिलेविरुध्द मुं. प्रो. अ‍ॅ. कलम 65 (ई)(फ) अन्वये गुन्हा दाखल करत पोलिसांनी 25 हजार रुपये किंमतीचे 500 लिटर कच्चे रसायन, 5 हजार रुपये किंमतीची 50 लिटर तयार दारु नष्ट केली आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

Visits: 85 Today: 1 Total: 1100023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *