लायन्स क्लब ऑफ सफायरची नागरिकांसाठी विशेष पर्वणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरने नागरिकांना स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष पर्वणी उपलब्ध करुन दिली आहे. सलग अठराव्या वर्षात ‘स्वातंत्र्योत्सव गाथा क्रांतीकारकांच्या’ या विषयावर पुणे येथील सुप्रसिद्ध वक्त्या मानसी बडवे विवेचन करणार आहे.

सध्या कोविडचा प्रादुर्भाव असल्याने रविवारी सायंकाळी सात वाजता ऑनलाईन पद्धतीने झूम अ‍ॅपद्वारे हा उपक्रम सादर होणार आहे. लायन्स क्लब कायमच वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्यानुसारच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम ठेवला आहे. तरी चित्तथरारक विवेचनाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प प्रमुख गिरीश मालपाणी, श्रीनिवास भंडारी, अध्यक्षा मीना मणियार, सचिन पूजा कासट, खजिनदार स्वाती मालपाणी आणि इतर सदस्यांनी केले आहे. यासाठी झूम अ‍ॅपचा मीटिंग आयडी – 9970310909 व पासकोड आयसीएसएस (आय कॅपिटल बाकी सर्व स्मॉल) आहे.

Visits: 51 Today: 1 Total: 429058

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *