पोखरी बाळेश्वरमध्ये विवाहितेचा विनयभंग

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील पोखरी बाळेश्वर येथे विवाहितेचा विनयभंग केल्याचा प्रकार बुधवारी (ता.14) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांत तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पोखरी बाळेश्वर येथे पीडित विवाहिता सरपण आणण्यासाठी गेली असता राजेंद्र जिजाबा फटांगरे, संकेत संजय फटांगरे व किरण संजय फटांगरे या तिघांनी संगनमताने काहीएक कारण नसताना झटापट करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच बचावासाठी आरडाओरड केली असता पती, सासू व सासरे आले असता त्यांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. यामध्ये पीडितेचे मंगळसूत्र गहाळ झाले आहे. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील तिघांविरोधात गुरुवारी (ता.15) गुरनं.172/2021 भादंवि कलम 354 (ब), 327, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आदिनाथ गांधले हे करत आहे.
