मुल्ला कटर गँगमधील आणखी एकास अटक श्रीरामपूर शहर पोलिसांची नेवासा फाटा येथे कारवाई


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
अल्पवयीन मुलीस फूस लावून तिच्यावर अत्याचार करणे, धर्मांतर करुन निकाह करुन तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणे. या प्रकरणातील मुल्ला कटर गँगमधील आणखी एकास श्रीरामपूर शहर पोलिसांनी नेवासा फाटा येथून जेरबंद केले आहे.

श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पसार गुफरान निसारखान पठाण ऊर्फ गुफ्या हा नेवासाफाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस शिपाई गौतम लगड, राहुल नरवडे, रमीजराजा अत्तार, गणेश गावडे, गौरव दुर्गुळे व पोलीस नाईक फुरकान शेख या पथकास रवाना केले.

या पथकाने मंगळवारी (ता.1) पहाटे 2 वाजेच्या सुमारास तपास पथक सापळा लावून बसले असता, तेथे मिळालेल्या वर्णनाचा इसम आला असता, त्यास शिताफीने झडप घालून पोलिसांनी पकडले असता, त्याने त्याचे नाव गुफरान निसारखान पठाण ऊर्फ गुफ्या असे सांगितले. त्यानुसार त्यास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके हे करीत आहेत. याप्रकरणात आता एकूण सात आरोपी झाले असून यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुध्द मोक्का लावून कारवाई करण्यात आली आहे.

Visits: 94 Today: 3 Total: 1101793

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *