संगमनेर विधानसभा मतदारसंघात इतिहास घडणार! महायुतीच्या अमोल खताळांची विजयी घोडदौड; मतमोजणीचे कल पाहता विजय निश्चित..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अपवाद वगळता संगमनेर विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेणाऱ्या महायुतीच्या अमोल खताळ यांची सोळाव्या फेरीनंतरही विजयाच्या दिशेने घोडदौड कायम असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अतिशय सामान्य कुटुंबातील तरुण म्हणून ओळख असलेल्या अमोल खताळ यांनी निकराने संगमनेरचा किल्ला लढवीत काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांना आपल्या राजकीय कारकीर्दीच्या चाळीसाव्या वर्षी पराभवाच्या उंबरठ्यावर उभे केले आहे. एकूण 21 फेऱ्यांमधील 17 व्या फेरीअखेर महायुतीच्या अमोल खताळ यांनी 12 हजार 134 मतांचे मताधिक्य घेतले आहे. या फेरीत त्यांना एकूण 93 हजार 923 तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांना हजार 81 हजार 789 मते मिळाली आहेत.

Visits: 80 Today: 2 Total: 403885