अभिमानास्पद! गरजू मुलांना दिल्या पाच सायकली भेट अभियंता विजयकुमार शेराल यांचे सामाजिक उत्तरदायित्व


नायक वृत्तसेवा, संगमनेर
ग्रामीण भागातील मोलमजुरी करणार्‍या परिवारातील मुले केवळ दळणवळणाची सोय नाही म्हणून शिक्षणापासून वंचित राहतात. तसेच काही जण 7 ते 8 किलोमीटर अंतर पायी चालत जातात, पण असे बरचसे विद्यार्थी कधी शाळा सोडून घरी बसतील हे सांगू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. अशा मुलांना सायकल उपलब्ध करून दिल्यास ते त्यांचे शिक्षण पूर्ण करु शकतील या उदात्त हेतूने संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालय येथील पाच विद्यार्थ्यांना विजयकुमार शेराल यांनी सायकली भेट दिल्या.

ज्ञानेश्वर विद्यालयात पारेगाव, सोनुशी, पिंपळे अशा 7 ते 8 किलोमीटर अंतरावरील गावांतून रोज पायी चालत येणार्‍या वीटभट्टी कामगार, खाण कामगार, शेतमजूरांच्या मुलांमधून पाच गरजू विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. याकामी आधार फाउंडेशनचे सुखदेव इल्हे व बाळासाहेब पिंगळे यांनी सहकार्य केले. संगमनेरच्या पद्मानगर येथील बालाजी मंदिर येथे सायकलींचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विजयकुमार शेराल, माध्यमिक शिक्षक संघटनेचे नेते व पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य हिरालाल पगडाल, पद्मशाली समाजाचे कारभारी पापय्या सिरसुल्ला, मधुकर वनम, समाज मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत एनगंदूल, निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद पगडाल, साथी भास्करराव दुर्वे नाना प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीनिवास पगडाल, शंकर शेराल, मीनाक्षी पगडाल, सुनीता पगडाल, लक्ष्मी शेराल, अनिता शेराल, प्रकाश शेराल, सुभाष शेराल, मीनाक्षी शेराल, चंद्रकांत आडेप, आधार फाउंडेशनचे सुखदेव इल्हे, बाळासाहेब पिंगळे, तानाजी आंधळे, लाभार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनी व त्यांचे पालक उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना हिरालाल पगडाल म्हणाले, अभियंता विजयकुमार शेराल यांनी आपले माध्यमिक शिक्षण मोलमजुरी करून पुर्ण केले तर अभियांत्रिकीचे शिक्षण समाजातील दानशूर व्यक्तींच्या आधारावर पूर्ण केले आहे. याची जाणीव ठेऊन ते समाजाचे उतराई होण्यासाठी सतत गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत करीत आले आहेत. आजही तळागाळातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य उज्ज्वल होण्यासाठी खास औरंगाबादहून या विद्यार्थ्यांना नवीन सायकली भेट देण्यासाठी इथे आले आहेत. समाजाच्या मदतीची जाण ठेऊन त्यांनी वंचितांच्या शिक्षणासाठी दिलेले आजचे योगदान अनमोल असून त्यांच्या दातृत्वाला सलाम करतो असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीनिवास पगडाल यांनी केले.

Visits: 8 Today: 1 Total: 118554

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *