डॉ.कर्पे यांचा साईभक्त मित्रपरिवारातर्फे सत्कार

डॉ.कर्पे यांचा साईभक्त मित्रपरिवारातर्फे सत्कार
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील साईनाथ रुग्णालयाचे संचालक प्रसिद्ध हृदयरोग आणि मधुमेह तज्ज्ञ डॉ.अमोल कर्पे यांनी कोरोना संकटात वैद्यकीय सेवेशी प्रामाणिक राहून कर्तव्य बजावल्याबद्दल साईभक्त मित्रपरिवारातर्फे नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.


सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढावले आहे. या भयावह परिस्थितीत मुख्य भूमिका बजाविणारे वैद्यकीय सेवेतील काही देवदूत प्रामाणिकपणे सेवा बजावत आहे. यामध्ये संगमनेरचे साईनाथ रुग्णालयाचे संचालक प्रसिद्ध हृदयरोग आणि मधुमेह तज्ज्ञ डॉ.अमोल कर्पे यांचाही प्रामुख्याने उल्लेख होतो. कर्तव्यापासून तसूभरही बाजूला न सरता इमाने इतबारे काम सेवा देत असल्यामुळे त्यांचा साईभक्त मित्रपरिवारातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला आहे. यावेळी मित्रपरिवाराचे प्रमोद मुळे, सोमनाथ परदेशी, सचिन कानकाटे, विनोद वाडेकर, नवनाथ मेहेत्रे, सचिन यादव, बाळासाहेब भुजबळ आदी मित्रपरिवार उपस्थित होता.

 

Visits: 108 Today: 1 Total: 1570730

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *