बकुपिंपळगावमध्ये नागरिकांच्या घरांत ओढ्याचे पाणी
बकुपिंपळगावमध्ये नागरिकांच्या घरांत ओढ्याचे पाणी
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील बकुपिंपळगाव येथे ओढ्याच्या पाण्याचा घरांना विळखा बसला असून ओढ्याकाठी राहणार्या नागरिकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात सध्या येथील ग्रामपंचायतमध्ये प्रभारी राज असल्यामुळे नागरीकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा सूर येथील रहिवाशांमध्ये आहे. त्यामुळे स्वतः गटविकास अधिकार्यांनी लक्ष घालून याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

नेवासा तालुक्यातील देवगड रस्त्याच्या मध्यावर बकुपिंपळगाव हे गाव वसलेले आहे. या गावाच्या मध्यभागी जुना ओढा असून त्याचे खोलीकरण झालेले नाही. त्यामुळे नुकत्याच झालेल्या पावसामुळे येथील ओढा पाण्याने तुडूंब भरला आहे. पाणी जाण्यासाठी कोणतीही उपाययोजना ग्रामपंचायतने केलेली नसल्याने या भागातील रहिवाशांच्या घरामध्ये पाण्याचा शिरकाव झाला आहे. यामुळे घरांना ओलावा लागला आहे. सरपंचपदाची मुदत संपल्याने सरपंचाचेही कोणी ऐकत नाही. सध्या ग्रामपंचायतर प्रभारी राज असून, गटविकास अधिकार्यांनी संबंधिताला आदेश देवून याबाबत लक्ष घालून यंत्रणेद्वारे या पाण्याची विल्हेवाट लावावी. आणि भयभीत रहिवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

